• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. the excitement of yoga day across the country political leaders along with prime minister modi did yoga spl

PHOTOS : देशभरात योग दिनाचा उत्साह; पंतप्रधान मोदींसह ‘या’ राजकीय नेत्यांनी केली योगासनं

२०१४ पासून २१ जून हा दिवस जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. पाहूया आजचे काही खास छायाचित्रे

Updated: June 21, 2024 12:06 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व केले. २०१५ पासून, पंतप्रधानांनी दिल्ली, चंदीगड, देहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर या ठिकाणी सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आहे. (PTI Photo)
    1/17

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व केले. २०१५ पासून, पंतप्रधानांनी दिल्ली, चंदीगड, देहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर या ठिकाणी सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आहे. (PTI Photo)

  • 2/17

    त्यानंतर पंतप्रधान मोदी योग दिनी सहभागी झालेल्या महिला नागरिकांसोबत सेल्फी फोटो काढताना दिसले. (Narendra modi/X)

  • 3/17

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकांसोबत योगासने केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी योग सत्रात भाग घेतल्यानंतर राष्ट्रपती भवनाने काही छायाचित्रे शेअर केली.  (PTI Photo)

  • 4/17

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिल्लीतील संसद भवन संकुलात लोकांसोबत योगासनात सहभाग घेतला.तसेच लोकसभा अध्यक्षांनीही देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  (PTI Photo)

  • 5/17

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लखनौच्या राजभवन प्रांगणात आयोजित सामूहिक योगसाधनेत सहभागी होऊन योगासन केले. (PTI Photo)

  • 6/17

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज योग दिनानिमित्त योगासने केली. मंत्रालयात आज योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (Express photo by Sankhadeep Banerjee. 21.06.2024)

  • 7/17

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही यावेळी योगासने करताना दिसून आले. (Express photo by Sankhadeep Banerjee. 21.06.2024)

  • 8/17

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील नागपुरात योगासने करताना दिसून आले. (Photo- Nitin Gadkari Facebook)

  • 9/17

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया दिल्लीत योग शिबिरात सहभागी झाले. (Photo- Mansukh Mandaviyai Facebook)

  • 10/17

    परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि इतर सहकारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीत योगासने करताना दिसली. (Photo- Dr S. Jaishankar Facebook)

  • 11/17

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इतर अधिकारी मथुरा, उत्तर प्रदेश येथे योग दिन साजरा करत आहेत. (Photo- BJP Uttar Pradesh)

  • 12/17

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीत योग सत्रात सहभाग नोंदवला. (Photo- Shivraj Singh Chouhan Facebook)

  • 13/17

    देशात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा होत आहे. (Express photos by Narendra vaskar 21.06.2024)

  • 14/17

    विविध क्षेत्रातील लोक योग दिन सक्रीय सहभाग नोंदवून साजरा करत आहेत. (Express photos by Narendra vaskar 21.06.2024)

  • 15/17

    अनेक ठिकाणी सामुहिक योगासन शिबिरे भरवली गेली. (Express photos by Narendra vaskar 21.06.2024)

  • 16/17

    सामुहिक योग करताना नागरिक. (Express photos by Narendra vaskar 21.06.2024)

  • 17/17

    आणखी एक छायाचित्र (Express photos by Narendra vaskar 21.06.2024) हेही पहा- PHOTOS : जगातली पहिली ‘एआय’ मॉडेल्स सौंदर्य स्पर्धा; अंतिम फेरीत भारताची ‘झारा शतावरी’! ‘इतकी’ आहे बक्षिसाची रक्कम

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: The excitement of yoga day across the country political leaders along with prime minister modi did yoga spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.