-
जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची किंमत लाखात नाही तर कोटींमध्ये आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की एका पक्ष्याच्या ९ ग्रॅम वजनाच्या पंखाची किंमत १० ग्रॅम सोन्याच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. (Wikipedia)
-
सध्या सोन्याचा भाव ७४ हजार रुपयांच्या आसपास आहे. पण आपण ज्या पक्ष्याबद्दल बोलत आहोत त्याच्या एका पंखाची किंमत तब्बल २० लाखांपेक्षा जास्त आहे. (New Zealand Birds Online)
-
न्यूझीलंडमध्ये झालेल्या लिलावात या पक्ष्याच्या पंखाला ४६ हजार ५१२ डॉलर्स (सुमारे २३ लाख भारतीय रुपये) मिळाले. हे पंख जगातील आतापर्यंतचे सर्वात महागडे पंख ठरले आहे. (@ habamoment /Insta)
-
वास्तविक, हे पंख १०० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या हुआया प्रजातीच्या पक्ष्याचे आहेत. सोन्याच्या दलालाने दिलेल्या माहितीनुसार, पंखाचे वजन फक्त ९ ग्रॅम आहे. (New Zealand Birds Online)
-
या पक्ष्याचे पंख दीर्घकाळ टिकून राहावेत म्हणून ते लिलावगृहात अर्काइव्हल पेपरसह यूवी-प्रोटेक्टिव ग्लासच्या मध्ये ठेवण्यात आले होते. (New Zealand Birds Online)
-
हुआया पक्षी याआधी १९०७ मध्ये दिसले होते. तथापि, ते १९२० पर्यंत अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. आता हुआया पक्षी नामशेष होऊन १०४ वर्षे लोटून गेली आहेत. (New Zealand Birds Online)
-
हुआया पक्ष्याच्या शरीरावर चमकदार काळी पिसे होती आणि लांब शेपटीच्या शेवटी थोडे पांढरे होते. या पक्ष्याची चोच लांब होती. (New Zealand Birds Online)
-
माओरी मानवी जमातीमध्ये हुआया पक्ष्याला खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या गाण्यांमध्ये आणि म्हणींमध्येही या पक्ष्याचा भरपूर उल्लेख आहे. इतिहासात सांगण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त माओरी राजांना या पक्ष्याच्या पिसापासून बनवलेले शिरपेच घालण्याची परवानगी होती. (New Zealand Birds Online)
PHOTOS : बघावं ते नवलचं! ‘या’ पक्ष्याच्या एका पंखाची किंमत आहे तब्बल २३ लाख रुपये!
World Most expensive bird feather: न्यूझीलंडमधील एका पक्ष्याच्या पंखाला लिलावात ४६ हजार ५२१ डॉलर्स (सुमारे २३ लाख भारतीय रुपये) मिळाले. हे पंख जगातील आतापर्यंतचे सर्वात महागडे पंख आहे.
Web Title: This bird s feather was auctioned for rs 23 lakh know why it is special spl