-
भारतीय रेल्वेने शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर हाय-स्पीड सीआरएसची चाचणी घेतली असून ती यशस्वीही ठरली आहे. चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे या पुलाची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हा प्रकल्प एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमा अंतर्गत राबवून तयार केला गेला आहे. हा पूल काश्मीर आणि इतर राज्यांमधील संपर्क मजबूत करण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. (छायाचित्रे: रेल्वे मंत्रालय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० फेब्रुवारी २०२४ रोजी जम्मू-काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन केले. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
चिनाब पुलाच्या बांधकामाला २००३ मध्ये मंजुरी मिळाली आणि २००८ मध्ये करार झाला. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान तयार करण्यात आलेला हा पूल, कटरा ते बनिहालपर्यंतच्या रेल्वे मार्गिकांमधील एक महत्त्वाचा दुवा ठरला आहे. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने मोठा असलेला हा पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर उभा आहे. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
चिनाब पुलासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
निर्मितीसाठी तीन वर्षे कालावधी लागलेल्या या पुलाच्या बांधकामात चिनाबच्या दोन्ही काठावर बसवण्यात आलेल्या दोन मोठ्या केबल क्रेनचा वापर करण्यात आला आहे. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
-
अंदाजे १२० वर्षांच्या अपेक्षित आयुर्मानासह, हा पूल २६० किमी/ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. तसेच भूकंप-प्रतिरोधक सुद्धा आहे. (रेल्वे मंत्रालय)
-
एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या प्रदेशातील वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी चिनाब पूल तयार आहे. (फोटो: रेल्वे मंत्रालय)
PHOTOS : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात; पाहा ‘चिनाब रेल्वे ब्रिज’ची ही अद्भुत छायाचित्रे!
चिनाब ब्रिज हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे या पुलाची काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ती पाहूयात.
Web Title: Chenab bridge ministry of railways shares awe inspiring pictures of worlds highest railway bridge see images spl