• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jagannath rath yatra 2024 why does the flag of jagannath temple wave in the opposite direction jagannath puri temple mysterious facts spl

Jagannath Rath Yatra : वाऱ्याच्या उलट्या दिशेने फडकतो ध्वज, जाणून घ्या जगन्नाथ मंदिराची ७ अद्भुत रहस्ये!

Jagannath Rath Yatra 2024, Jagannath Rath Yatra, History of Jagannath Rath Yatra, Jagannatha Mysterious facts: पुरी येथील जगन्नाथ मंदिरासंबंधी अनेक रहस्ये आहेत जी आजपर्यंत उलगडलेली नाहीत.

Updated: July 8, 2024 11:49 IST
Follow Us
  • Jagannatha Rath Yatra date 2024
    1/9

    सनातन धर्मात जगन्नाथ रथयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथ यांना रथयात्रा काढून प्रसिद्ध गुंडीचा मातेच्या मंदिरात नेले जाते तिथे भगवान सात दिवस विश्रांती घेतात. यानंतर भगवान जगन्नाथाचा परतीचा प्रवास सुरू होतो. पण या मंदिराशी निगडीत अनेक अशी रहस्ये आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. (ANI)

  • 2/9

    ओडिशातील समुद्र किनारी असलेल्या पुरी शहरामध्ये स्थापित असलेले जगप्रसिद्ध मंदिर भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्णाला समर्पित आहे. येथील देव दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक दरवर्षी येथे येतात. चला जाणून घेऊया या मंदिराशी संबंधित चमत्कारिक गोष्टी (PTI)

  • 3/9

    ध्वज उलट दिशेने फडकतो
    जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. साधारणपणे, दिवसा समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहतात आणि संध्याकाळी जमिनीवरून समुद्राकडे, परंतु येथे ही प्रक्रिया उलट आहे. हे गूढ आजपर्यंत कोणालाही उकलता आलेले नाही. (PTI)

  • 4/9

    जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र देखील स्थापित आहे, असे म्हटले जाते की आपण कोणत्याही दिशेने उभे राहून पाहिल्यास हे चक्र आपल्या दिशेने तोंड करत असल्याचे दिसते. (ANI)

  • 5/9

    सावली कधीच तयार होत नाही
    यासोबतच जगन्नाथ मंदिराच्या शिखराची सावली नेहमीच अदृश्य राहते. आत्तापर्यंत मंदिराच्या सावलीला जमिनीवर कोणीही पाहिलेले नाही. (ANI)

  • 6/9

    मंदिराच्या आत समुद्राच्या लाटा ऐकू येत नाहीत
    जगन्नाथ मंदिराशी संबंधित आणखी एक रहस्य म्हणजे मंदिराच्या आत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही. पण मंदिरातून बाहेर पडताच लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. हे मंदिर समुद्राजवळ आहे. (ANI)

  • 7/9

    पक्षी वर बसत नाहीत
    जगन्नाथ मंदिरावरून पक्षी जात नाहीत आतापर्यंत कोणीही शिखरावर एकही पक्षी बसलेला पाहिलेला नसून, हेही एक रहस्यच आहे. (ANI)

  • 8/9

    स्वयंपाकघरातील रहस्ये
    मंदिराच्या स्वयंपाकघरात भक्तांसाठी प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकावर एक ठेवली जातात. अद्भुत आणि रहस्यमय बाब म्हणजे सर्वात वरच्या बाजूला ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो आणि नंतर एकापाठोपाठ वरून खालच्या क्रमाने भांड्यातील प्रसाद शिजतो. (PTI)

  • 9/9

    मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसाद संपतो.
    कितीही भाविक आले तरी प्रसाद कधीच कमी होत नाही, हेही एक रहस्य आहे. पण मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो. (PTI) हेही वाचा AI Photos : जर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांनी ‘पंचायत’मध्ये काम केले तर कोण कोणत्या भूमिकेत शोभेल? पाहा फोटो

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Jagannath rath yatra 2024 why does the flag of jagannath temple wave in the opposite direction jagannath puri temple mysterious facts spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.