-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशियाची मैत्री खूप जुनी आहे. पीएम मोदी आणि पुतिन भेटले तेव्हा संपूर्ण जग पाहतच राहिले. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊन अनेक निर्णय घेण्यात आले. (पीटीआय)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट झाली तेव्हा या दोन्ही नेत्यांसोबत एक महिलाही दिसली. त्यानंतर लोकांमध्ये या महिलेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोण आहे ही महिला याबद्दलची उत्सुकता आता आपण संपवूया, जाणून घेऊयात या महिलेबद्दल. (PTI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोघेही त्यांच्या मातृभाषेत बोलण्यास प्राधान्य देतात. अशा स्थितीत दोन्ही नेत्यांना एकमेकांचे म्हणणे समजून घेण्यासाठी अनुवादकाची गरज पडते. (PTI)
-
दोन्ही नेत्यांसोबत दिसणाऱ्या या महिलेबाबत ती अनुवादक असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिलेला रशियाने कामावर ठेवले होते. ती रशियन भाषेतून हिंदी आणि हिंदीतून रशियन भाषेत दोन्ही नेत्यांना अनुवाद करून माहिती देत होती. (PTI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी विशेष व्यवस्था केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींना खाण्यासाठी रशियातील विशेष असे पंचपक्वान्न पदार्थ देण्यात आले. (PTI)
-
दोन्ही नेत्यांमधील भेटीची काही छायाचित्रे समोर आली असून त्यात रशियाची भारताशी असलेली जवळीक दिसून येते. यावेळी दोन्ही नेते इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करताना दिसले. (PTI)
-
मात्र, पंतप्रधान मोदींच्या या भेटीमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थाच्या मते, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते पाहीन, परंतु मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही त्यांचे रशियाशी संबंध पाहिले आहेत संबंधांबाबत आमच्या असलेल्या चिंताही भारताला स्पष्ट केल्या आहेत”. (PTI)
-
यासोबतच ते म्हणाले, “अमेरिकेला आशा आहे की, भारत किंवा इतर कोणताही देश रशियाशी चर्चा करेल तेव्हा हे स्पष्ट करेल की मॉस्को संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा तसेच प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला गेला पाहिजे”. (PTI)
-
खरे तर रशियापासून दूर राहण्यासाठी अमेरिका भारतावर सुरुवातीपासूनच दबाव आणत आहे. पण भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे की भारत स्वतःची भूमिका घेऊ शकतो. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताने आवाज उठवला होता. (PTI)
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्यासोबत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पुतीन यांनी रशियन लष्कराला सर्व भारतीयांना मुक्तता देऊन त्यांना भारतात परतण्यास मदत करण्यास सांगितले. (PTI)
-
या भेटीवेळी दोन्ही नेते घोड्यासोबत एका तबेल्यात दिसले. (PTI)
PHOTOS : पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यासोबत दिसणारी ‘ती’ महिला कोण? पाहा रशिया दौऱ्यातील दोन्ही नेत्यांचे फोटो
Secret Woman seen with PM Modi and Putin, PM Modi Russia Visit, PM Modi and Putin: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांसह एक महिला दिसत आहेत. कोण आहेत त्या जाणून घेऊ
Web Title: Secret woman seen with pm narendra modi and vladimir putin in russia who is she spl