-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे त्यांच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. १२ जुलै रोजी हे जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नापूर्वी या जोडप्याचे दोन प्री-वेडिंग फंक्शन झाले आहेत. पहिले झाले गुजरातमधील जामनगरमध्ये आणि दुसरी क्रूझ पार्टीही झाली. दरम्यान आता त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. लग्नाआधी हळदी, मेहेंदी आणि संगीताचे विधी सुरू झाले आहेत. आदल्या दिवशीच हळदीनंतर मेहंदीचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. (Photo- Jansatta)
-
बुधवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी अँटिलियामध्ये शिवशक्ती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय मेहंदी सोहळा आणि गरबा नाईटही पार पडली. रणवीर सिंग, शनाया कपूर, अनन्या पांडे, संजय दत्त यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. (Photo- Jansatta)
-
अनंत-राधिकाच्या मेहंदी सोहळ्यात रणवीर सिंग कुर्त्यामध्ये दिसला होता. यापूर्वी हळदी समारंभातही तो पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसला. यादरम्यान त्याचा लूक अतिशय खास होता. (Photo- Jansatta)
-
अनंत राधिकच्या मेहेंदीसाठी अनन्या पांडे लेहेंग्यात दिसली. तिचा साधा लुक आणि तसाच मेकअप चाहत्यांना आवडला. (Photo- Jansatta)
-
दरम्यान यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूरही सतत चर्चेत आली आहे. अंबानींच्या प्रत्येक फंक्शनमध्ये ती लेहेंग्यात दिसली. तिचा हाही लेहेंगा आउटफिट अप्रतिम आहे. (Photo- Jansatta)
-
शनाया कपूरने तिच्या सिंपल लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकली. ती शरारा स्टाईल ड्रेसमध्ये दिसली होती. यादरम्यान ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (Photo- Jansatta)
-
इतकेच नाही तर शनाया कपूरने अनंत-राधिकाच्या मेहंदी सोहळ्यात तिच्याही हातावर मेहंदी लावली. या दरम्यानचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील तिचा साधा लुक चाहत्यांची मनं जिंकत आहे. (Photo- Shanaya Kapoor/Insta)
Anant-Radhika Wedding: पाहा अनंत-राधिकाच्या मेहेंदी सोहळ्यातील बॉलीवूड स्टार्सचे ग्लॅमरस अवतार, शनाया कपूरने मेहंदीही लावली!
Anant-Radhika Mehandi Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट उद्या १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. अशा परिस्थितीत नुकताच त्यांचा हळदी आणि मेहंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता, या सोहळ्यांना बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
Web Title: Anant radhika wedding mehandi ceremony janhvi kapoor ranveer singh shanaya kapoor ananya pandey bollywood celebs attend function spl