-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल १४ जुलै रोजी, पंढरपूरला निघालेल्या वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
-
पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातून निघालेला श्री संत निळोबाराय पालखी सोहळा वाटेत असताना विठू माऊली या नामाचा गजर करत मुख्यमंत्री वारीबरोबर चालले.
-
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री दादा भुसे त्यांच्यासमवेत होते.
-
आषाढी एकादशी आता काहीच दिवसांवर राहिलेली आहे.
-
त्याच पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी काल मुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर होते.
-
पालखीत चालताना मुख्यमंत्र्यांनी संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संत निळोबाराय यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
-
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधला.
-
दरम्यान. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी चंद्रभागा नदीत पाय धुतले.
-
वारीतील सहभागी महिला भगिनींनी त्यांना राखीही बांधली.
-
वारकरी संप्रदायाचा ध्वज यावेळी मुख्यमंत्र्यांनी खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
-
तसेच, वारकऱ्यांच्या भजनात तल्लीन होत, मुख्यमंत्री शिंदे विठुरायाचे नामस्मरण करत असल्याचेही पाहायला मिळाले.
-
मुख्यमंत्री शिंदेनी वारीत टाळ वाजवला.
-
तसेच विणाही घेतला.
-
येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी आहे.
-
यंदाच्या आषाढी एकादशीला गतवर्षीप्रमाणे विठुरायाच्या पूजेचा मान मुख्यमंत्री शिंदेंनाच मिळणार आहे.
-
परंपरेनुसार मुख्यमंत्री पदावरील व्यक्तींना हा मान दिला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची पूजा केली जाईल.
-
(सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)
विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी! पाहा फोटो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीत सहभाग नोंदवला, त्याची ही काही छायाचित्रे.
Web Title: Cm eknath shinde participated in pandharpur waari see photos spl