-
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील सोमवारी मध्यरात्री पावणेएक वाजता वारक-यांची बस आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला.
-
अपघातामध्ये आतापर्यंत पाचजणांचे प्राण गेले असून सहा रुग्ण अजूनही गंभीर आहेत.
-
जखमींवर कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अत्यावस्थेत तर इतर रुग्णांवर उपचार सूरु आहेत.
-
सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात ज्या ट्रॅक्टरमुळे हा अपघात घडला तो ट्रॅक्टर अपघातापूर्वी द्रुतगती महामार्गावरील मधल्या रांगेत उभा असल्याची धक्कादायक माहिती बसचालक संजय पाटील यांनी दिलेल्या जबाबात उघड झाली आहे.
-
त्यामुळे ट्रॅक्टर द्रुतगती महामार्गावर उभा राहीलाच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामधील पाच मृतांपैकी ट्रॅक्टर चालक व त्याच्या सहका-याची ओळख तब्बल १० तासांनी झाली.
-
या अपघातामध्ये ट्रॅक्टरचालक २७ वर्षीय तरेवाज सलाउद्दीन अहमद (रा. उत्तरप्रदेश, मधुबन) तसेच त्याचा सहकारी ३० वर्षीय दीपक सोहन राजभर (रा. उत्तरप्रदेश, महू) यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
-
५४ प्रवाशांची बस ट्रॅक्टरला ठोकरुन द्रुतगती महामार्गावरील खोल खड्ड्यात गेल्याने बसमधील तीन जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. पोलीस उपायुक्त पानसरे यांच्या नेतृत्वाखाली या अपघाताची चौकशी सूरु असून सकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती फोनवरुन घेतली.
-
पोलीस तपासामध्ये संबंधित ट्रॅक्टर चुकीच्या मार्गाने जात असल्याचे समजल्याने ट्रॅक्टर उजव्या बाजूला वळण घेत असताना हा अपघात झाल्याचा संशय पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आहे.
-
नेमका अपघात झाला कसा याची चौकशी पोलीस करीत असून तीन पोलीस उपनिरिक्षक व कर्मचारी बसचालक, बसमधील प्रवासी, बसचा प्रवास सूरु झाल्यापासूनचा सीसीटिव्ही कॅमेरातील छायाचित्र, ट्रॅक्टरचा मालक यांच्याकडे चौकशी करत आहेत.
PHOTOS : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाताचे भीषण फोटो आले समोर, आतापर्यंत पाच जण दगावल्याची माहिती
Bus Accident on Mumbai Pune Expressway : पोलीस तपासामध्ये संबंधित ट्रॅक्टर चुकीच्या मार्गाने जात असल्याचे समजल्याने ट्रॅक्टर उजव्या बाजूला वळण घेत असताना हा अपघात झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.
Web Title: Accident on mumbai pune express latest update see photos spl