-
उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज पहाटे २.३५ वाजता साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघातात रेल्वेचे २२ डबे रुळावरून घसरले. (पीटीआय फोटो)
-
हा अपघात कानपूर सेंट्रल ते भीमसेन स्थानकादरम्यान घडला. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात घटनास्थळी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (पीटीआय फोटो)
-
कानपूरहून साबरमती ट्रेन जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशनवर परत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून बसेसची सोय करण्यात आली. पीटीआय फोटो)
-
इंजिनासमोर बसवलेले बोल्डर इंजिनला आदळल्याने हा अपघात झाला असल्याचे लोको पायलटने सांगितले आहे. (पीटीआय फोटो)
-
बोल्डर इंजिनला आदळताच इंजिनचा कॅटल गार्ड वाकला गेला. त्यामुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनेसंबंधी एक्स या प्लॅटफार्मवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे. रेल्वे रुळावर मोठा दगड आढळून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. (पीटीआय फोटो)
-
रेल्वेमंत्र्यांनी या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना आयबीला दिल्या आहेत. असा मोठा दगड रेल्वे रुळावर कसा पोहोचला?, याचा तपास केला जाणार आहे. (पीटीआय फोटो)
-
रेल्वे अपघातानंतर जवळपास ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ७ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)
Kanpur Train Accident: कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही, दुर्घटनेचं कारण काय?
Kanpur Train Accident: देशात रेल्वे अपघातांचे जणू सत्रचं सुरु झाले आहे, काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये रेल्वे अपघात झाला होता, त्यानंतर इतर काही ठिकाणीही रेल्वे अपघात झाल्याचे पाहायला मिळाले होते, आज सकाळी कानपूरजवळ साबरमती एक्स्प्रेस रेल्वेचे २२ डबे रुळावरून घसरले. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
Web Title: 22 coaches of ahmedabad bound sabarmati express derail near kanpur spl