-

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८० वी जयंती आज म्हणजेच २० ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. भारतात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ सद्भावना दिन साजरा केला जातो. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान त्यांचे पुत्र लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आज वडिलांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या समाधी स्थळी पोहोचले. मुसळधार पावसात राहुल यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
यावेळी रॉबर्ट वड्रा आणि त्यांचा मुलगाही उपस्थित होते. राहुल यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
आपल्या वडिलांच्या आठवणीत राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे “बाबा, तुमची शिकवण माझी प्रेरणा आहे. भारतासाठीची तुमची स्वप्नं तीच माझीही स्वप्न आहेत. तुमच्या आठवणी सोबत घेऊन मी ती स्वप्नं पूर्ण करेन”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. (फोटो स्रोत: @RahulGandhi/twitter)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहिले, “आपले माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.” (फोटो स्रोत: @narendramodi/twitter)
-
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बंगळुरू येथे त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के सेल्वापेरुन्थागई यांनी पक्षाच्या नेत्यांसह माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रीपेरुंबदूर येथील त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. १९८४ मध्ये वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपद मिळवले होते. पण २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमध्ये एका सभेला संबोधित करताना राजीव गांधींची हत्या झाली. (पीटीआय फोटो)
(हे देखील वाचा: पृथ्वीवर उपग्रहाचा कचरा कोठे ठेवला आहे हे जाणून घ्या, सामान्य माणसांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे )
माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती: मुसळधार पावसात सुपुत्र राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; पीएम मोदींनीही काढली आठवण
Rajiv Gandhi 80th Jayanti: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी आज मुसळधार पावसात वीर भूमी समाधी स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.
Web Title: Rahul gandhi pays tribute to father rajiv gandhi on his 80th birth anniversary amid heavy rain spl