Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. badlapur school case two small girls molested at washrooms what exactly is the case spl

Badlapur School Case : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अत्याचार; स्थानिकांचा उद्रेक, नेमकं काय आहे प्रकरण?

मुली शाळेत जायला तयार नसल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

August 20, 2024 15:14 IST
Follow Us
  • Badlapur Protest
    1/9

    बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली असताना बदलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून बदलापूरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्जचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे, त्याच वेळी बदलापूरमध्ये शाळेच्या ठिकाणी जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत काय काय झाले आहे? हे जाणून घेऊयात.

  • 2/9

    बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या २ मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

  • 3/9

    लघुशंकेसाठी जाताना शाळेच्याच शिपायाकडून या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार.

  • 4/9

    १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.

  • 5/9

    या मुली शाळेत जायला तयार नसल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

  • 6/9

    दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

  • 7/9

    परंतु गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • 8/9

    या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • 9/9

    लघुशंकेसाठी मुली एकट्या कशा पाठवल्या?, सेविका असताना त्या सोबत का गेल्या नाहीत? असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जातोय. तर बदलापूर बंदनंतर मात्र लोकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशा प्रकारची मागणी करत मोठ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर विविध राजकीय नेते आता त्यांच्या भूमिका मांडताना दिसत आहेत. (All Phoos: Social Media)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Badlapur school case two small girls molested at washrooms what exactly is the case spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.