-
दसरा हा सण ज्याला विजयादशमी देखील म्हणतात, भारतात दरवर्षी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. दसरा हा सण शतकानुशतके जुना असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. (एएनआय फोटो)
-
हा सण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासानंतर आणि दुर्गादेवीच्या उपासनेनंतर येतो. भगवान रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दसरा हा सण साजरा केला जातो. (एएनआय फोटो)
-
हा दिवस रामायणाच्या कथेतील महत्त्वाच्या क्षणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जेव्हा भगवान राम यांनी लंकेचा राक्षस राजा रावणाचा वध केला होता. (एएनआय फोटो)
-
रामायणानुसार, रावणाने माता सीतेचे अपहरण केल्यानंतर राम आणि रावण यांच्यात मोठे युद्ध झाले. आपली पत्नी सीता परत मिळवण्यासाठी रामाने लंकेवर आक्रमण केले आणि रावणाचा पराभव केला. (एएनआय फोटो)
-
हा विजय अधर्मावर नीतिमत्तेचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, जे वाईटाचा अंत निश्चित असल्याचा संदेश देतात. (एएनआय फोटो)
-
त्यानंतर अधर्मावर धर्माचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही दसरा २०२४ निमित्त देशभरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. (एएनआय फोटो)
-
दसऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रावण दहन, जेथे रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या महाकाय पुतळ्यांचे दहन केले जाते. (एएनआय फोटो)
-
हे दृश्य केवळ प्रेक्षणीयच नाही, तर वाईटाचा नेहमी अंत होतो हा महत्त्वाचा संदेशही देत आहे. (एएनआय फोटो)
-
नवरात्रीनंतर, विजयादशमीच्या दिवशी, रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या मूर्तींचे जवळजवळ संपूर्ण भारतात दहन केले जाते. अनेक ठिकाणी फक्त रावणाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. (एएनआय फोटो)
-
रावण दहनासाठी देशभरातील बाजारपेठा सजल्या आहेत. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत. (पीटीआय फोटो)
-
हे पुतळे लाकूड, बांबू, कागद आणि कपडे यांच्या साहाय्याने बनवले जातात. काही पुतळ्यांमध्ये फटाके आणि लायटिंगही लावल्या जातात. (पीटीआय फोटो)
-
यंदा विविध शहरांमध्ये रावणाच्या पुतळ्याची निर्मिती आणि सजावटीची तयारी जोरात सुरू आहे. कलाकार आणि कारागीरांनी खास मोठ्या आकाराचे आणि रंगीबेरंगी पुतळे तयार केले आहेत. (पीटीआय फोटो)
-
यावेळी द्वारकेच्या रामलीला मैदानात उंच आणि प्रचंड रावणाची उभारणी करण्यात आली असून २११ फूट उंच असलेली ही मूर्ती लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (पीटीआय फोटो)
-
रावणाचा हा पुतळा बनवण्यासाठी ३० लाख रुपये खर्च झाले आहेत. यासाठी ४० कारागिरांनी चार महिने अविरत काम केले आहे.
-
रंगीबेरंगी पुतळे, लायटिंग, सजावट साहित्य आणि उत्सवी वातावरण यामुळे सर्वत्र बाजारपेठांची गर्दी वाढली आहे. (पीटीआय फोटो)
-
देशभरातील या छायाचित्रांमधून लक्षात येते की दसऱ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आता रात्री होणाऱ्या रावण दहनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. (पीटीआय फोटो)
हेही पाहा – Photos : भारताव्यतिरिक्त ‘या’ देशांमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दसरा!…
Dussehra 2024: देशभरात रावण दहनाची ‘अशी’ होतेय तयारी, पाहा Photos
Ravana Dahan: दसरा हा केवळ एक सण नाही तर हा एक असा प्रसंग आहे जेव्हा आपणा सर्वांना वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश मिळतो. हा सण भगवान श्रीराम यांनी रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Web Title: Dussehra 2024 celebrating victory of good over evil preparations are being made for ravana dahan across country spl