-
या वर्षांत स्पेनला सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. भीषण पुरस्थितीमुळे गावखेडे तसेच शहरांतील वाहने वाहून गेली आहेत. रस्त्यांची स्थिती खूप भयावह झाली असून दक्षिण आणि पूर्व स्पेनमधील किमान ९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (रॉयटर्स)
-
स्पेनमध्ये दुर्मिळ चक्रीवादळ आलेले आहे. या वादळामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. गारपीट होते आहे. त्यामुळे नागरिकांचे घरांच्या काचा तसेच वाहनांचे मोठे नुकसान होते आहे. देशात सध्या असामान्य हवामान तयार झाले आहे. (रॉयटर्स)
-
व्हॅलेन्सियामध्ये आतापर्यंत ९५ लोक मरण पावले तर कॅस्टिलाच्या मध्यवर्ती प्रदेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चक्री वादळाने स्पेनच्या भूमध्य सागरी किनाऱ्याचा बराचसा भाग व्यापला आहे, अनेक लोक अनेक बेपत्ता झाले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते. (एपी)
-
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालागा ते व्हॅलेन्सियापर्यंत भीषण पूर आला, त्यामुळे गढूळ पाणी रस्त्यावरून वाहत होते, त्यासह वाहने, वस्तु आणि मातीचा मलबाही वाहत आला. (रॉयटर्स)
-
लेतूरमध्ये अतिवृष्टीमुळे पूर येऊन गेल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मलबा हटवण्याचे काम करत आहे. पोलिस आणि बचाव पथकांनी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी रबर बोटीचा वापर केला. (रॉयटर्स)
-
स्पेनच्या आपत्कालीन प्रतिसाद युनिटमधील १ हजाराहून अधिक सैनिक उद्ध्वस्त भागात लोकांना मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. लेतूरमधील बचाव कार्यात सुदैवाने बचवलेल्या नागरिकांना ते सर्वतोपरी मदत देत आहेत. (एपी)
-
स्पेनमध्ये तीव्र दुष्काळ ते विक्रमी उच्च तापमान अशा विविध हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, ज्याला शास्त्रज्ञ हवामान बदलाशी जोडत आहेत. (रॉयटर्स)
-
पुरामुळे माद्रिद आणि बार्सिलोना शहरांकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती संबधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (रॉयटर्स)
-
स्पेनमधील व्हॅलेन्सियामध्ये लोक पूरग्रस्त रस्त्यावरून चालताना. विशेषत: दुर्गम भागात शोधकार्य सुरूच असल्याने इथे मृतांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. (एपी)
Photos : स्पेनमध्ये भीषण पुरामुळे आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू, रस्त्यांची दुरावस्था, रेल्वे सेवा ठप्प
विशेषत: दुर्गम भागात शोधकार्य सुरूच असल्याने इथे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्पेनच्या केंद्र सरकारने बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी एक संकट समिती स्थापन केली आहे.
Web Title: Spain s deadliest floods kill 95 roads closed rail services halted spl