• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. maha kumbh mela witnessing massive turnout on makar sankranti 2025 spl

Mahakumbh Mela 2025: मकर संक्रांतीला महाकुंभमेळ्यात भाविकांचा महापूर, अमृत स्नानासह हर हर महादेवचा जयघोष

Makar Sankranti 2025 च्या निमित्ताने प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर आला आहे. लाखो भाविक पवित्र संगमात स्नान करण्यासाठी आले होते. महाकुंभातील शाही स्नानाचे महत्त्व मोठे आहे. हे स्नान विशेष तारखांवर आयोजित केले जातात, जे ज्योतिषीय गणनेच्या आधारे निर्धारित केले जातात.

Updated: January 15, 2025 14:41 IST
Follow Us
  • Maha Kumbh 2025
    1/12

    *प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू झाला असून यावेळी २६ फेब्रुवारीपर्यंत हा मेळा चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाकुंभात साधू-भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/12

    हा सण धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे, जेथे लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी येतात. महाकुंभाचा दुसरा दिवस आणि पहिले शाही स्नान १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे. (पीटीआय फोटो)

  • 3/12

    महाकुंभातील शाही स्नानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. शाहीस्नान हे ते दिवस असतात जेव्हा ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार नद्यांचे पाणी अमृतासारखे झालेले असते. (पीटीआय फोटो)

  • 4/12

    या दिवशी स्नान केल्याने माणसाचे पाप धुऊन जाते व पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्मात असे मानले जाते की या काळात देव स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि स्नान करण्यासाठी संगमावर येतात. (पीटीआय फोटो)

  • 5/12

    शाहीस्नान हा मोक्षप्राप्तीचा प्रमुख मार्ग मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभात पहिले शाही स्नान होते. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे गंगा स्नानाचे महत्त्व अधिक वाढते. (पीटीआय फोटो)

  • 6/12

    विशेषत: मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्त होते. यामुळेच या दिवशी लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी गर्दी करतात. (पीटीआय फोटो)

  • 7/12

    या दिवशी स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मनाला शांती मिळते. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी संगमात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना या दिवसाचे महत्त्व कळले. (पीटीआय फोटो)

  • 8/12

    या दिवशी शाही स्नानादरम्यान नागा साधू हातात गदा घेऊन संगमात स्नान करताना मस्ती करताना दिसतात. या साधूंचे हे रूप एक अद्भुत धार्मिक अनुभव असतो. (पीटीआय फोटो)

  • 9/12

    महाकुंभाचा दुसरा दिवस आणि शाही स्नानाच्या पहिल्या दिवसाची छायाचित्रे अतिशय खास आणि भावनिक आहेत. संगमाच्या तीरावर असलेल्या त्रिवेणीत लाखो भाविक पवित्र स्नान करत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 10/12

    यावेळी आखाड्यांचे साधू-महंतही संगमाच्या काठावर पोहोचून अमृत स्नान करतात. संगम काठावर या संत-मुनींचे आगमन भाविकांसाठी खूप प्रेरणादायी असते. (पीटीआय फोटो)

  • 11/12

    याबरोबर जय भोले, हरहर महादेवचा जयघोष वातावरणात एक वेगळेच श्रद्धेचे वातावरण निर्माण करतो. यावर्षीही मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रयागराजच्या संगम किनारे भाविकांच्या उत्साहाने आणि धार्मिक मंत्रोच्चारांनी दुमदुमले. (PTI फोटो/कमल किशोर)

  • 12/12

    लाखो भाविक गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर श्रद्धेने स्नान करताना दिसले. यावेळी संगमाच्या काठावर ‘हर हर गंगे’ आणि ‘जय भोले’चा गजर झाला. थंडी असली तरी स्नानासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. (पीटीआय फोटो)
    हेही पाहा- Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीसाठी सायली संजीवचा काळ्या साडीतील सुंदर लूक, पाहा फोटो

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमहाकुंभ मेळा २०२५Maha Kumbh Mela 2025

Web Title: Maha kumbh mela witnessing massive turnout on makar sankranti 2025 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.