-
प्रयागराजमध्ये जेव्हा-जेव्हा कुंभ-महाकुंभ मेळा येतो तेव्हा नागा साधू आणि संत खूप चर्चेत येतात. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
संत आणि ऋषींची विविध रूपे येथे पाहायला मिळतात. महाकुंभासाठी आलेल्या संत-मुनींचे अनोखे रूप पाहूया: (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात कार चालवणारा नागा साधूही चर्चेत आला आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
महाकुंभमेळ्यात काही नागा बाबा त्यांच्या केसांतील रुद्राक्षांच्या जटांमुळे चर्चेत होते, तर कुणाची तपश्चर्या पाहून लोक आश्चर्यचकित झाले होते. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
डोक्यावर जड रुद्राक्षांच्या माळा घातलेले हे बाबा महाकुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना आशीर्वाद देताना दिसत होते. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
या नागा साधूंचे जटांमध्ये रुद्राक्ष धारण केलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
या बाबांचीही महाकुंभमेळ्यात खूप चर्चा होत आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
खरंतर त्यांचा लूक खूप चर्चेत आहे. नागा बाबांनी फोनवर बोलत असताना काळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
कुंभमेळ्यातील अनोख्या लूकमुळे आणखी अनेक संत आणि ऋषी चर्चेत आहेत. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
अनेक बाबा त्यांच्या साधनेमुळे चर्चेत राहतात. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मोठी गर्दी दिसून आली, तर तिसऱ्या दिवशी संगमावर फारच कमी लोक दिसले. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
१३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत सुमारे ६ कोटी भाविकांनी स्नान केले आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
महाकुंभ २०२५ ची सांगता २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीला होईल. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
मान्यतेनुसार महाकुंभात श्रद्धेने स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी)
-
महाकुंभ हा केवळ धार्मिक मेळा नसून लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. (इंडियन एक्सप्रेस फोटो रेणुका पुरी) हेही पाहा-
Photos : कोणी काळा चष्मा घातला तर कोणी चालवली कार; महाकुंभ मेळ्यातील ‘या’ साधू- बाबांची होतेय चांगलीच चर्चा, फोटो व्हायरल
Maha Kumbh Viral Baba, Sadhu and Saint: जेव्हा-जेव्हा कुंभ-महाकुंभ मेळा आयोजित केला जातो तेव्हा नागा साधू, बाबा आणि संत चर्चेत असतात. महाकुंभ मेळा २०२५ मध्येही असे अनेक बाबा आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत.
Web Title: Maha kumbh baba sadhu and saint from wearing glasses to driving a car spl