-
महाकुंभात संगम स्थानी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सर्वत्र लोकांच्या सामानाचा चुराडा पडलेला दिसत आहे. सामानाच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
-
चेंगराचेंगरीत आपल्या प्रियजनांपासून विभक्त झालेल्या लोकांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करताना पोलीस दिसले. लोकांना पोलिसांनी घरी जाण्याचे आवाहन केले आहे.
-
चेंगराचेंगरीनंतर लोकांना संगमाकडे जाण्यापासून रोखण्यात आले. लाऊडस्पीकरद्वारे घोषणा देण्यात आल्या आणि लोकांना संगमावर ते जिथे असतील तिथेच स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले.
-
मौनी अमावस्येला आखाड्यातील नागा साधूंना शाही स्नान करावे लागले. मात्र परिस्थिती लक्षात घेऊन आखाडा परिषदेने तेही आता रद्द केले आहे. आधी दोन आखाडे स्नानासाठी निघाले होते पण नंतर परतले.
-
महाकुंभाच्या सर्वात मोठ्या स्नानाच्या वेळी झालेली चेंगराचेंगरी आणि शाही स्नान रद्द झाल्याने सर्वत्र निराशेच वातावरण पाहायला मिळत आहे.
Photos : महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांमध्ये पसरली निराशा, फोटोंमधून कळतेय भीषणता
मौनी अमावस्येच्या स्नानापूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप मृत्यूना दुजोरा दिलेला नाही. चेंगराचेंगरीच्या घटनास्थळावरून समोर येणारे फोटो हे अतिशय भयावह आहेत…
Web Title: Mahakumbh stampede photos reveal the seriousness of stampede during mauni amavasya shahi snan spl