• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. why is india sudarshan s 400 defence missile system so dangerous weapon hrc

Photos: भारताच्या सुदर्शन एस-४०० ची वैशिष्ट्ये जाणून घ्या!

केवळ पाकिस्तानच नाही तर चीन देखील भारताच्या आकाश रक्षक सुदर्शन एस-४०० ला घाबरतो. संपूर्ण जगाला त्याची ताकद माहित आहे. ते इतके खास का आहे आणि ते कसे कार्य करते ते आम्हाला कळवा:

Updated: May 10, 2025 18:25 IST
Follow Us
  • Air defense missile system S-400 dangerous
    1/14

    ७ मे आणि ८ मे रोजी अनुक्रमे मध्यरात्री आणि पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांतील लष्करी आस्थापनांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 2/14

    पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्युत्तर देणार याची कल्पना भारताच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला होतीच. त्यामुळे या ड्रोन हल्ल्याला कुचकामी ठरवण्यासाठी भारताची ड्रोन व क्षेपणास्त्र बचाव प्रणाली सज्ज होती. (फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 3/14

    रशियाने भारताल्या दिलेल्या एस-४०० क्षेपणास्त्र बचाव प्रणाली अर्थात ‘सुदर्शन चक्रा’ने पाकिस्तानचे कुटिल मनसुबे हाणून पाडताना, भारतीय सैनिक आणि लष्करी इमारतींचे रक्षणही केले. (छायाचित्र: Минобороны России/फेसबुक)

  • 4/14

    याबरोबरच पाकिस्तानकडून पुन्हा कुरापती होऊ नयेत, यासाठी भारतानेही ड्रोन हल्ले करून लाहोर व इतर शहरांतील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली. (फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 5/14

    रशियाने भारताला ‘एस-४०० ट्रायन्फ’ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली गेल्या वर्षी दिली. जगातील अत्यंत मोजक्याच देशांकडे अशा प्रकारची प्रणाली आहे.(फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 6/14

    एस-४०० ट्रायम्फ चे नामकरण भारताने सुदर्शन चक्र असे केले. सुदर्शन चक्र हे भगवान विष्णूंचे प्रमुख अस्त्र. त्याचा उल्लेख महाभारतासह अनेक पुराणग्रंथांमध्ये आहे. वेग, अचूकता आणि प्रलयक्षमता ही वैशिष्ट्ये सुदर्शन चक्र क्षेपणास्त्र बचाव प्रणालीतही अंतर्भूत आहेत. (फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 7/14

    एस-४०० सुदर्शन चक्र प्रणाली ४०० किलोमीटर दूरवरून येणाऱ्या लक्ष्याला नष्ट करू शकते आणि ६०० किलोमीटरवर असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या प्रणालीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. (फोटो: Минобороны России/फेसबुक)

  • 8/14

    लढाऊ विमानांपासून ड्रोनपर्यंत आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून क्रूझ क्षेपणास्त्रांपर्यंत कोणत्याही वस्तूचा वेध ही प्रणाली घेऊ शकते. ही क्षमता तिला वैविध्यपूर्ण आणि अतिशय उपयुक्त बनवते. ए-४०० सुदर्शन चक्रावर अत्याधुनिक रडारयंत्रणा कार्यान्वित असते. (छायाचित्र: एपी)

  • 9/14

    एकाच वेळी १०० विविध लक्ष्यांचा वेध घेण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. ही मोबाइल लाँचरवर बसवलेली असल्यामुळे तीस लवचीकता प्राप्त होते. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी तिची हालचाल करता येऊ शकते. लष्करी आस्थापना आणि नागरी वस्त्यांचे रक्षण करण्याची ती क्षमता भारताला अभेद्य बनवते. शिवाय तिचे इलेक्ट्रॉनिक जॅमिंग करून तिला निरुपयोगी बनवणे जवळपास अशक्य आहे. (छायाचित्र: एपी)

  • 10/14

    एस-४०० सुदर्शन चक्र प्रणाली भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत येते. कारण भारताच्या हवाई हद्दींचे आणि अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी हवाई दलाची असते. प्रत्येक एस-४०० स्क्वाड्रनमध्ये दोन दोन उपप्रणाली असतात. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)

  • 11/14

    प्रत्येकामध्ये सहा क्षेपणास्त्र लाँचर्स किंवा प्रक्षेपक, एक रडार युनिट, एक कंट्रोल सेंटर असते. या उपप्रणाली हवाई दलाच्या मध्यवर्ती संपर्ककेंद्राशी संलग्न असतात.
    (छायाचित्र- संरक्षण पृष्ठ/एफबी)

  • 12/14

    सध्या भारताकडे पाचपैकी तीन एस-४०० प्रणाली कार्यान्वित असून, उर्वरित दोन भारताकडे २०२६मध्ये दाखल होत आहेत.(छायाचित्र: एपी)

  • 13/14

    एकापेक्षा अधिक क्षेपणास्त्रे, स्वतंत्र रडार यंत्रणा हाताशी असल्यामुळे या यंत्रणेला ‘चुकवून’ क्षेपणास्त्रे डागणे शत्रूस जवळपास अशक्य असते. (छायाचित्र: एपी)

  • 14/14

    पाकिस्तानकडून १५ प्रक्षिप्तकांचा (ड्रोन आणि क्षेपणास्त्रे) मारा होऊनही प्रत्येक नष्ट करण्यात भारताला यश आले, यावरून एस-४०० सुदर्शन चक्र प्रणालीची क्षमता ध्यानात येते. (छायाचित्र: एपी)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi News

Web Title: Why is india sudarshan s 400 defence missile system so dangerous weapon hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.