-
आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील वडाळा येथील ऐतिहासिक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची विधिवत पूजा केली.
-
राज्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, तसेच समस्त जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभावे यासाठी त्यांनी विठुमाऊलीच्या चरणी साकडे घातले.
-
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विठुमाऊलीची पूजा करण्याचे सौभाग्य लाभले, याचा त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पत्नी सौ. लता शिंदे यांच्यासमवेत विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तींना पंचामृत स्नान घातले.
-
तुळशीच्या माळा आणि फुलांनी सुशोभित करून, त्यांना पारंपरिक वस्त्रे परिधान केली.
-
यावेळी त्यांनी श्रद्धेने विठोबाची आरती केली आणि विविध धार्मिक विधी पूर्ण केले.
-
पूजेदरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि भक्तिभाव दिसत होता.
-
राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुख, समाधान आणि समृद्धी लाभावी, बळीराजाने पिकवलेल्या धान्याला चांगला भाव मिळावा, राज्यात चांगला पाऊस पडून शेती सुजलाम सुफलाम व्हावी, तसेच शेतकरी, कष्टकरी, कामगार, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन त्यांचे आयुष्य आनंदाने भरून जावे, यासाठी त्यांनी विठ्ठलचरणी विनम्रपणे साकडे घातले.
-
या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.
-
आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेनेचे प्रवक्ते श्री. शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सह-मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक अभय धोले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे/इन्स्टाग्राम)
Ashadhi Ekadashi 2025: वडाळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल पूजन; राज्याच्या कल्याणासाठी घातले साकडे
आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसमवेत वडाळ्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करत राज्याच्या सुख, शांती व समृद्धीसाठी साकडे घातले. भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा धार्मिक सोहळा भक्तिरसात न्हालेला होता.
Web Title: Ashadhi ekadashi 2025 deputy chief minister eknath shinde vitthal pooja wadala temple svk 05