-
गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता.
-
शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये तासाभरात पाणी साचलं.
-
पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. लोकल ट्रेन सेवेवरही उशिराचा परिणाम झाला.
-
रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही BEST बस मार्ग रद्द किंवा वळवण्यात आले.
-
पाण्यात अडकलेल्या वाहनांमुळे ट्रॅफिकची स्थिती गंभीर झाली. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
-
तसेच आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे समुद्राच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
-
नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असे प्रशासनाने म्हटले आहे.
-
(फोटो – गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस)
Mumbai Rain Update: मुंबईला सकाळपासून पावसाने झोडपलं; वाचा महत्त्वपूर्ण अपडेट्स
Mumbai heavy rainfall: शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक विस्कळीत झाली. लोकल आणि बस सेवा उशिराने सुरू आहेत. हवामान खात्याचा जोरदार पावसाचा इशारा कायम आहे.
Web Title: Photos mumbai heavy rain update local delays traffic alert july 2025 svk 05