-
Lalbaugcha Raja 2025 First Look : गणपती बाप्पा मोरया… भाविकांना दरवर्षीप्रमाणं यंदाही गणेसोत्सवाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यातच आज लालबागचा राजाची पहिली झलक समोर आली आहे. (फोटो- लालबागचा राजा यूट्यूब चॅनल)
-
अवघ्या मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ‘लालबागचा राजा’ भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो- लालबागचा राजा यूट्यूब चॅनल)
-
आज २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.०० वाजता ‘लालबागचा राजा’चा प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)
-
यावेळी असंख्य भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)
-
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे ९२ वं वर्ष आहे. (फोटो- लालबागचा राजा यूट्यूब चॅनल)
-
गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. (एक्सप्रेस फोटो- आकाश पाटील)
-
भाविकांसाठी ‘Lalbaugcha Raja’ या युट्यूब चॅनेलवरून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. (फोटो- लालबागचा राजा यूट्यूब चॅनल)
-
लालबागचा राजाचं विलोभनीय रूप (फोटो- लालबागचा राजा यूट्यूब चॅनल)
-
दरम्यान, गणेशोत्सवाला काही तास शिल्लक असताना रेल्वेतून गणरायांना घरी नेताना भाविक (एक्सप्रेस फोटो- गणेस शिर्सेकर) हेही पाहा- भारतात कोणतं AI App सर्वात लोकप्रिय आहे? ChatGPT कितव्या स्थानी?
Ganeshotsav 2025: गणपती बाप्पा मोरया… ‘लालबागचा राजा’चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; पाहा विलोभनीय रूपाची पहिली झलक
Lalbaugcha Raja 2025 First Look : भाविकांसाठी ‘Lalbaugcha Raja’ या युट्यूब चॅनेलवरून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Web Title: Ganeshotsav 2025 lalbaugcha raja first look 2025 online mukh darshan mumbai ganpati photos spl