-
जगातल्या सर्वात ताकदवान रागासा या चक्रिवादळाने तैवानच्या हुआलियन काउंटीमध्ये प्रचंड नुकसान केले आहे, शहरालगत असलेला एक तलाव फुटल्याने आलेल्या पूरामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२९ जण बेपत्ता झाले आहेत. या प्रचंड शक्तिशाली वादळामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक पूल वाहून गेले आहेत आणि हाँगकाँगमध्ये विमान उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि विमान कंपन्यांनी सूचना जारी केल्या आहेत.
-
असोसिएटेड प्रेसच्या ताज्या अपडेटनुसार, हुआलियनमधील गुआंगफू टाउनशिपमध्ये एक तलाव फुटल्याने चौदा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
किमान १२९ लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
या वादळामुळे स्थानिकांच्या मालमत्तेचाही प्रचंड विनाश झाला आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
सुमारे १,००० रहिवासी असलेल्या दामा गावासह इतरही संपूर्ण गावे पाण्याखाली गेली आहेत, तसेच इतर गावांचाही संपर्कही तुटला आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
अन्न आणि पाणी पुरवण्यासाठी लष्कराने ३४० बचावपथक सैनिक पाठवले आहेत. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
गुआंगफूच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ६०% म्हणजे सुमारे ५,२०० लोकांनी घरांच्या वरच्या मजल्यांवर आश्रय घेतला आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
आज आपत्कालीन सायरन वाजल्यानंतर पुराच्या वादळाच्या भीतीने आणखी काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
संबंधित अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की तलावातून ६० दशलक्ष टन पाणी बाहेर फेकले गेले आहे, जे एका मोठ्या जलाशयाच्या बरोबरीचे आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
स्थानिक अधिकाऱ्यांनी अपंग रहिवाशांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही सांगितले. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर X वर माहिती दिली आहे की प्रतिकूल हवामान अंदाजामुळे फ्लाइट AI1314 (दिल्ली-हाँगकाँग, 23 सप्टेंबर आणि AI315 (हाँगकाँग-दिल्ली, 24 सप्टेंबर) रद्द करण्यात आली आहेत. (छायाचित्र स्रोत: AP)
-
बुधवारी दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेनमध्ये हे वादळ धडकणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होत खबरदारी घेतली आहे. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
बुधवारी दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन येथे असलेल्या महाकाय शिल्पांजवळील समुद्रकिनाऱ्यावर लाटा आदळल्या. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
आज दुपारी, २४ सप्टेंबर २०२५ रोजी वादळामुळे हाँगकाँगमध्ये त्सुंग क्वान ओ परिसरात रस्त्यावर एक झाड उन्मळून पडले. (छायाचित्र स्रोत: एपी)
रागासा चक्रिवादळाचा कहर! तैवानमध्ये १४ मृत्यू, अनेक बेपत्ता; शाळा-कार्यालयं बंद, भारताकडे येणारी विमानं रद्द
असोसिएटेड प्रेसच्या ताज्या अपडेटनुसार, हुआलियनमधील गुआंगफू टाउनशिपमध्ये एक तलाव फुटल्याने चौदा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Web Title: Typhoon ragasa wreaks havoc worlds strongest storm kills at least 14 in taiwan hits hong kong with all force latest updates in pictures spl