Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kawah ijen volcano in indonesia erupts electric blue lava at night scsg

‘या’ ज्वालामुखीमधून बाहेर पडतो रात्रीच्या अंधारात चमकणारा निळा लाव्हारस; जाणून घ्या काय आहे कारण

या ज्वालामुखीचे फोटो सध्या व्हायरल झालेत

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • भूअंतर्गत शीघ्र हालचालींमुळे भूकवचाला खोल व विस्तीर्ण भेग पडून या भेगेतून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त शिलारस, वायू आदी पदार्थ भूपृष्ठावर येऊन पसरतात. तप्त शिलारस भूपृष्ठावर आल्यानंतर थंड होतो. त्याचे रूपांतर कठीण खडकात होते. याच तप्त शिलारसाला ज्वालामुखी असं म्हणतात. ही व्याख्या तुम्ही शाळेत भुगोलाच्या पुस्तकामध्ये नक्कीच वाचली असणार.
    1/10

    भूअंतर्गत शीघ्र हालचालींमुळे भूकवचाला खोल व विस्तीर्ण भेग पडून या भेगेतून पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त शिलारस, वायू आदी पदार्थ भूपृष्ठावर येऊन पसरतात. तप्त शिलारस भूपृष्ठावर आल्यानंतर थंड होतो. त्याचे रूपांतर कठीण खडकात होते. याच तप्त शिलारसाला ज्वालामुखी असं म्हणतात. ही व्याख्या तुम्ही शाळेत भुगोलाच्या पुस्तकामध्ये नक्कीच वाचली असणार.

  • 2/10

    ज्वालामुखीमधून बाहेर येणारे तप्त शिलारस हा भगव्या, पिवळ्या आणि लाल रंगाचा असतो हे ही आपण अनेकदा डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीसारख्या चॅनेलवर पाहिलं असेल. सध्या मात्र इंटरनेटवर चर्चा आहे ती निळ्या ज्वालामुखीची… काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात..

  • 3/10

    सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये निळ्या रंगाचा ज्वालामुखी दिसत आहे. युट्यूबवर Truly या चॅनेलने ज्वालामुखीमधून निळा शिलारस बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हीडीओ अनेक वर्ष जुना असला तरी पुन्हा तो नव्याने चर्चेत आला आहे. (Photo: Olivier Grunewald)

  • 4/10

    सामान्यपणे ज्वालामुखीमधून बाहेर येणारे तप्त शिलारस हा भगव्या, पिवळ्या आणि लाल रंगाचा असतो मात्र या ज्वालामुखीतील निळ्या शिलारसाचे रहस्य काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ हा इंडोनेशियामधील ज्वालामुखीचा आहे. (Photo By: , Reuben_WuTwitted by Twitter/RnfrstAll_UK)

  • 5/10

    पॅरिसमध्ये राहणारा आणि मागील अनेक वर्षांपासून ज्वालामुखींसंदर्भात अभ्यास करणार फोटोग्राफर ऑलिव्हर ग्रेनवॅल्ड (Olivier Grunewald ) याने यासंदर्भातील कारण सांगितलं आहे. (Photo: Olivier Grunewald, Twitted by Twitter/DeansDailyDoses)

  • 6/10

    ग्रेनवॅल्ड म्हणतो की निळ्या रंगाचा शिलारस म्हणजेच लाव्हासर अस्तित्वात नसतो. जेव्हा सल्फर असणारे वायू ज्वालामुखीमधून बाहेर येतात तेव्हा त्यांती वातावरणातील ऑक्सिजनशी प्रक्रिया होते. त्यामुळे निळ्या रंगाचा शिलारस दिसतो. हा सल्फर मिश्रीत शिलारस डोंगरांवरुन खाली येतो तेव्हा लाव्हा सर वाहत असल्यासारखं वाटतं. (Photo: Olivier Grunewald)

  • 7/10

    ग्रेनवॅल्डच्या सांगण्यानुसार हा निळा रंग दिवसाऐवजी रात्री अधिक प्रकाशमान आणि स्पष्ट दिसतो. (Photo: Screen Shot from Youtube/Truly)

  • 8/10

    सोशल मिडियावर याच डोंगरावरुन खाली वाहत येणाऱ्या सल्फरयुक्त लाव्हाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकांना हे फोटो खूपच आवडले आहेत. (Photo: Olivier Grunewald Screen Shot from Youtube/Truly)

  • 9/10

    सल्फरचे प्रमाण जास्त असणाऱ्या डोंगरावर असा निळा शिलारस दिसून येतो. हा निळा रंग लाव्हाचा नसून तो तेथील जमीनीमुळे निर्माण झाल्याचे काही शास्त्रज्ञ सांगतात. (Photo: Screen Shot from Youtube/Truly)

  • 10/10

    ज्वालामुखीखाली मोठ्याप्रमाणात सल्फर असल्यास असा रंग दिसून येतो. सल्फर जळल्याने निळा रंग दिसतो असं वैज्ञानिक सांगतात. गॅसच्या बर्नरजवळ निळ्या रंगाची आग दिसते तसाच हा प्रकर आहे. (Photo: Screen Shot from Youtube/Truly)

Web Title: Kawah ijen volcano in indonesia erupts electric blue lava at night scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.