• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ajit pawar birthday special popular statements by ncp leader scsg

वाढदिवस विशेष : अजितदादांचे हे डायलॉग्ज चांगलेच गाजले

आज अजित पवार यांचा वाढदिवस

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काशी काही गाजलेली वक्तव्य...
    1/15

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काशी काही गाजलेली वक्तव्य…

  • 2/15

    "सूनेत्रा तर तिथून निघूनच आली" : "मुंबईला येत असताना जी मुंबईची कामं असतील तिच घेऊन या. बरेच जण विचारल्यावर सांगतात, काही नाही दादा सहज भेटायला आलो, म्हणतात. सहज देखील भेटायला येऊ नका. एकतर अजून सरकारी घर मिळायचं असतं, ते मिळालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या घरात राहतोय, तिथे डायनिंग टेबलवर माणस बसवावी लागतात. हॉलमध्ये बसवावी लागतात. बेडरूममध्ये माणसांना बसवावं लागतं. सूनेत्रा तर तिथून निघूनच आली. म्हणाली, आता राहतच नाही इथे. जोपर्यंत मोठं घर मिळत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला समजून उमजून घ्या,” असं अजित पवार कार्यकर्त्यांना संदेश देताना म्हणाले होते.

  • 3/15

    "एका कार्यक्रमात मी सात वाजता गेलो होतो" : अजित पवार यांच्या कामाचा उरक आणि आवाका मोठा आहे. त्यामुळे यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घ्या अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती. मात्र अजित पवारांनी त्यांना शाब्दिक चिमटे काढत सकाळी लवकर उठायची सवय करुन घ्या असं प्रत्युत्तर दिलं होतं. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. विविध मंत्र्यांकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दादांच्या बैठका सुरु आहेत. आम्ही सगळे त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊनच काम करत आहोत. मात्र त्यांनी सकाळी दहाऐवजी अकराला कार्यक्रम ठेवावेत” असंही आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना शाब्दिक चिमटे काढले. “सकाळी लवकर उठायची सवय ठेवा. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मी सात वाजता गेलो होतो. त्यावेळी अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. लवकर उठून काम करावं लागतं. मी हे सगळं शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे. ” असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.

  • 4/15

    "फडणवीस यांनी इतकं केलं तर आम्हाला सुगीचे दिवस येतील" माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये फडणवीस यांच्या पुस्तकाचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, फडणवीसांनी राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं म्हटलं होतं. "“देवेंद्र फडणवीसांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकाल असं आम्हाला जाणवायला लागलं आहे आणि विषयाची जाण जर बघितली तर राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. तसं झाल्यास आम्हाला पण सुगीचे दिवस येतील. आमचं जरा बरं चालेल," असं पवार म्हणाले होते. “देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. राम नाईक आलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या या ज्ञानाचा उपयोग दिल्लीत करून घ्यावा. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल,” अशी टोलेबाजी करत अजित पवार यांनी कार्यक्रमात रंगत आणली होती.

  • 5/15

    "हनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा" उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं होतं. “करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.

  • 6/15

  • 7/15

    "काल, आज आणि उद्या पवार कुटंबीय एकत्रच असणार" "काल, आज आणि उद्याही पवार कुटुंबीय एकत्रच असणार, आमच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यापेक्षा देशाचा विकास कसा होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहावे", असे उत्तर अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. वर्धा येथील भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीय आणि शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्यावर आज अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे. एवढंच नाही तर आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे, आम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.

  • 8/15

    “अरे त्याचा बाप सांगतोय ना” : मार्च महिन्यामध्ये एका पत्रकाराने अजित पवारांना पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही”. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं भन्नाट उत्तर दिलं.

  • 9/15

    “त्यांना काय माहिती होतं की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार अन्…” अर्थसंकल्प मांडता सभागृहात होणाऱ्या गोंधळावरुन अजित पवार यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प मांडतानाची आठवण सांगितली. “मला आठवतय बरोबर सहा वर्षापूर्वी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सभागृहामध्ये मी माझा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना सगळे विरोधीपक्षाचे आमदार गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता. त्या गोंधळातही माझ्यासमोरच्या विरोधी बाकावरील एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर ठेऊन अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा त्याच्यातील बारकावे लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. माझ्या मनाला इतकं वाईट वाटतं होतं की हे इतकं बारकाईने ऐकतायत थोडसं यांना मुनगंटीवारांना समजून सांगायला काय हरकत आहे. फडणवीस अतीशय शांतपणे ऐकत होते. तर मुनगंटीवार अगदी जोरजोरात घोषणा देत होते. गिरिष महाजन तर विचारुच नका. त्यांना काय माहिती की पुढं हाच बाबा मुख्यमंत्री होणार आहे. पुढं याच्याच हाताखाली काम करायचं आहे,” अशी टीप्पणी अजित पवारांनी केली. यानंतर सभागृहामधील सर्वच नेते हसू लागले.

  • 10/15

    "…तर मी दोषी आढळल्यास राजकारण सोडून देईन" : मावळ गोळीबार प्रकरणी अजित पवार दोषी असल्याची टीका करण्यात येते. या प्रश्नावर अजित पवार यांनी २०१९ मध्ये एका प्रचारसभेत आपली भूमिका मांडली होती. "मी कोणालाही आदेश दिले नाहीत. यासंदर्भात काही जर संभाषण असेल त्यांनी सादर करावे. तसेच सीबीआय, सीआयडी या संस्था मार्फत चौकशी करावी. आता तर त्यांचेच सरकार असल्याने या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असून या चौकशीचा अहवाल लोकांसमोर यायला पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी देखील शेतकऱ्यांचा पोरगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही. गोळीबार प्रकरणी माझ्या वरील आरोप खोटे असून मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावण्यास तयार असून मी दोषी आढळलो तर राजकारण सोडून देईन," असं पवार म्हणाले होते.

  • 11/15

    "सूर्याकडे पाहून थुंकलं तर काय होणार?" : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या टीकेला उत्तर देताना, “शरद पवार यांना उभा भारत देश ओळखतो. कुठलंही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा इतर काही समस्या. शरद पवार उमेदीच्या काळात तर फिरलेच मात्र या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो याचा जराही विचार जो माणूस करत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? सूर्याकडे पाहून थुंकल तर थुंकी आपल्याच अंगावर पडणार ना?”, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. "जी व्यक्ती बोलली त्यांचा स्वभाव तसाच आहे. पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही बोलले होते. एखाद्याला नको तितकं महत्त्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी सर्वांची डिपॉझिट जप्त केली तसं याचंही डिपॉझिट जप्त केलं. यावरुन जनाधार त्यांच्यामागे किती आहे ते समजतं, राज्याने ते ओळखलं आहे. आम्ही असल्या माणसांकडे लक्ष देत नसतो," असंही अजित पवार म्हणाले होते.

  • 12/15

    "शप्पथ खरं सांगतो, असं झालं तर मुनगंटीवार सर्वाधिक खूष होतील" ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विधिमंडळातील नेत्यांनी फडणवीस यांच्या कौतुकाचे निमित्त साधत टोले, चिमटे व फटकारे लगावत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राजकीय रंगपंचमीच साजरी केली होती. कार्यक्रमाला सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचाही समावेश होता. फडणवीस यांच्या पुस्तकाचे कौतुक करुन झाल्यानंतर भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी नाईक यांचा उल्लेख करत फडणवीस यांच्या ज्ञानाचा उपयोग दिल्ली करण्यासंदर्भातील हलचाली कराव्यात अशी इच्छा बोलून दाखवली. “रामनाईक साहेब तुम्ही या कार्यक्रमाला हजर आहात. तर जरा वर म्हणजेच दिल्लीला सांगितलं की हे (फडणवीस) साहित्यिक पण आहेत, यांना बरचं ज्ञान आहे. तर त्या ज्ञानाचा दिल्लीमध्ये आपण उपयोग करुन घेऊ. असं ठरल्यास महाराष्ट्राच्या खालच्या सभागृहाच्या २८८ सभासदांची त्याला एकमताने मान्यता राहिलं. त्यातही फडवीस दिल्लीला गेल्यास सर्वाधिक आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होतील,” असं मत अजित पवारांनी मांडलं. त्यानंतर गळ्याजवळ हात नेत, “गळ्याची आण खोटं बोलत नाही,” असं म्हणत फडणवीसांकडे पाहिलं. पवारांच्या या मजेदार टिप्पणीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

  • 13/15

    "भाजपाचा सत्तेचा माज उतरवायचा असेल आमच्या हाती सत्ता द्या" : "आमच्या हाती सत्ता दिल्यावर तीन महिन्यांमध्ये सात बारा कोरा न केल्यास पवारांची औलाद आहे, असं सांगणार नाही," असं अजित पवार यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी सांगितले होते.

  • 14/15

    अजित पवार

  • 15/15

    "ये बारामतीमध्ये बघतोच तुला" : २०१९ मध्ये पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू, असे विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. यावरुन महाजन यांना उद्देशून अजित पवार यांनी, "ये बारामतीमध्ये बघतोच तुला… ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय. लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे," असं म्हटलं होतं.

Web Title: Ajit pawar birthday special popular statements by ncp leader scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.