• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. world vadapav day top 10 popular vadapav in mumbai city scsg

World Vadapav Day: मुंबईतले दहा ‘जगात भारी’ वडापाव

आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन…

August 23, 2020 14:10 IST
Follow Us
  • आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करायला हवेत…
    1/

    आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं. याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करायला हवेत…

  • 2/

    १) अशोक वडापाव – प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा अस्वाद घेतला आहे.

  • 3/

    २) ग्रॅज्यूएट वडापाव – भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव मिळतो. हा वडापाव मुंबईमधील बेस्ट वडापावमधील एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून लोक इथल्या वडापावचा अस्वाद घेत आहेत.

  • 4/

    ३) बोरकर वडापाव – गिरगावातील बोरकर वडापाव हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना प्रचंड आवडते. गिरगाव चौपाटीवर देखील या वडापावचा आनंद घेता येतो.

  • 5/

    ४) भाऊ वडापाव – भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे 'भाऊ वडापाव'. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.

  • 6/

    ५) लक्ष्मण वडापाव – घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे.

  • 7/

    ६) शिवाजी वडापाव – मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे. अनेक लोकांना या वडापावची चव आवडते.

  • 8/

    ७) सम्राट वडापाव – मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.

  • 9/

    ८) आनंद वडापाव – विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.

  • 10/

    ९) कुंजविहार वडापाव – ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.

  • 11/

    १०) गजानन वडापाव – चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे ठाण्यातील गजानन वडापाव. हा वडापाव ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.

Web Title: World vadapav day top 10 popular vadapav in mumbai city scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.