-
गुजरातमधील एका कलाकाराने गोटी, माचिसची काडी आणि खडू सारख्या लहान लहान वस्तुंवर गणेशाची प्रतिमा साकारली आहे. पाहणारी व्यक्ती थक्क होईल अशा या कलाकृती आहेत. (सर्व फोटो : एएनआय)
-
खडूवर साकारलेली ही गणरायाची प्रतिमा पाहा. हा खडू अगदी बोटाच्या आकाराऐवढा आहे. या कलाकृती साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे प्रजेश शाह.
-
ही पाहा गोटीवर साकरलेलं हे गपणती बाप्पाचं चित्र. कला विषयाचे शिक्षक असणाऱ्या शाह यांनी ही भन्नाट कलाकृती साकारली आहे.
-
गोटी आणि खडूबरोबरच या कलाकाराने थेट माचिसच्या काडीवरही गणरायाचे चित्र रेखाटले आहे.
-
"मी या कलाकृती साकारताना त्या इतक्या स्पष्ट आणि उठावदार पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न केला आहे की त्या पाहण्यासाठी मॅग्निफाइन ग्लासची गरज लागत नाही," असं शाह एएनआयशी बोलताना म्हणाले.
खरा कलाकार… काडीपेटीमधील काडी, गोटी आणि खडूवर साकारला गणपती बाप्पा
कला विषयाच्या शिक्षकाची भन्नाट कला एकदा पाहाच
Web Title: Artist made images of lord ganesh on a piece of chalk a matchstick and a toy marble