-
जवळपास १० महिन्यांपासून जगभरातील डॉक्टर्स आणि नर्स खासगी किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. एखाद्या योद्ध्याप्रमाणे ते करोनाविरोधात लढतायेत.
-
करोनाग्रस्तांच्या सेवेत असलेल्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून सतत पीपीई किटमध्ये वावरावं लागतं. पण दररोज 10-12 तासांसाठी मास्क आणि पीपीई किट घातल्याने त्यांना किती त्रास होत असेल याचा कधी विचार केलाय का ?
-
अमेरिकेच्या टेनेसी राज्यामध्ये एक २७ वर्षीय नर्स आठ महिन्यांपासून करोनाग्रस्तांची सेवा करत आहे. पण, आठ महिने सतत करोनाग्रस्तांसोबत राहून त्यांची सेवा केल्यानंतर नर्सच्या चेहऱ्यावर परिणाम झाला असून काही बदल झाल्याचं समोर आलं आहे.
-
नर्सने ट्विटरवर (@kathryniveyy) स्वतः आपले दोन फोटो शेअर करुन चेहऱ्यामध्ये किती बदल झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आठ महिने करोनाग्रस्तांची सेवा केल्यानंतर चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलल्याचं तिने म्हटलंय.
-
पहिला फोटो करोना व्हायरसचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीचा आहे, तर दुसरा फोटो आठ महिने करोनाग्रस्तांची सेवा केल्यानंतरचा आहे. दोन्ही फोटोंमधला फरक स्पष्ट दिसून येतोय. आठ महिने करोनाग्रस्तांवर उपचार केल्यानंतर तिचा चेहरा पूर्ण सूजलेला आणि लालसर झाल्याचं दिसून येत आहे.
Before & After : सलग आठ महिने करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या नर्सची अवस्था बघाच
दररोज 10-12 तासांसाठी मास्क आणि पीपीई किट घातल्याचा परिणाम…
Web Title: Nurse before after pictures show the impact of treating covid 19 for months sas