-
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली, पंजाबसह देशभरातील शेतकरी दिल्लीत एकवटले आहेत.
-
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता तीव्र होताना दिसत आहे.
-
रविवारी (दि.१२) या आंदोलनाला पाठिंबा देत भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही…काळे कायदे मागे न घेतल्यास आपला खेलरत्न पुरस्कार परत देण्याची घोषणा केली. त्यामुळे विजेंदर सिंह सध्या चर्चेत आलाय.
-
तर, शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या एका फेक ट्विटमुळे आणि शेतकरी आंदोलनाला विरोध केल्याने अभिनेत्री कंगना रणौतही प्रचंड चर्चेत आहे.
-
शेतकरी आंदोलनावरुन पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांज आणि कंगना रणौत एकमेकांना भिडले असून दोघांचा वाद शिगेला पोहोचलाय.
-
दोघांमध्ये सुरू असलेल्या या ट्विट वॉरमध्ये भारताचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही उडी घेतल्याचं आता समोर आलं असून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झालीये.
-
कंगनाने दिलजीत दोसांजला रिप्लाय देताना एका ट्विटमध्ये त्याचा उल्लेख करण जोहरचा 'पाळीव श्वान' आणि 'चमचा' असा केला होता.
-
दिलजीत आणि कंगनामध्ये बाचाबाची सुरू असतानाच कंगनाच्या त्या ट्विटवर विजेंदर सिंहने कंगनाला, चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास असं म्हणत, "गलत पंगा ले लिया बहन "असा इशारा देणारं ट्विट केलं होतं.
-
विजेंदर सिंहने निशाणा साधल्यानंतर कंगनाही शांत बसणार नव्हतीच, थोड्यावेळातच तिनेही त्याला उत्तर देताना "क्यों, तू शिवसेना बनाएगा… भाई? अशी विचारणा केली.
-
कंगनाच्या या प्रश्नावर विजेंदर सिंहनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'शिवसेना तर आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि कामही खूप चांगलंच करतेय', असं बोचरं उत्तर विजेंदरने कंगनाला दिलं. त्यासोबत त्यात एक स्माइली असलेल्या इमोजीचाही वापर केला. हिंदीमध्ये, "वो तो बन रखी है और काम भी अच्छा कर रही है" असा टोला विजेंदरने कंगनाला मारला. विजेंदरच्या या जबरदस्त उत्तरानंतर मात्र कंगनाची त्यावर काहीही रिएक्शन आली नाही. खेलरत्न पुरस्कार परत देण्याचा इशारा दिल्यामुळे चर्चेत आलेल्या विजेंदरचं कंगनाला प्रत्युत्तर देणारं हे ट्विटही आता जोरदार व्हायरल होत आहे.
‘क्यू तू भी शिवसेना बनाएगा क्या?’, कंगनाच्या प्रश्नावर बॉक्सर विजेंदर सिंहचं ‘बोचरं’ प्रत्युत्तर
शिवसेनेवरुन प्रश्न विचारणाऱ्या कंगनाला विजेंदरचा जोरदार ‘ठोसा’…
Web Title: Vijender singh remarks on kanganas spat with diljit dosanjh actress writes tu bhi shiv sena banayega sas