-
केरळमधील त्रिशूर येथील अथिराप्पिल्ली गावातील एका घरामध्ये चक्क मगर शिरली. घरामध्ये मगर पाहताच सर्वांची एकच धावपळ सुरु झाली.
-
चालकुड्या नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर घर असणाऱ्या साबू यांच्या घराच्या अंगणामधून मगरीने घरात प्रवेश केला. घरात असणाऱ्या साबू यांच्या पत्नीला मगर दिसताच त्यांनी घरातील इतर व्यक्तींना ओरडून घरात मगर शिरल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार नऊ डिसेंबर रोजी घडला.
-
सकाळी सकाळी आम्हाला अंगणातून विचित्र आवाज येऊ लगला. मात्र आम्ही हा कुत्र्याचा किंवा माकडाचा आवाज असल्याचे समजून त्याकडे दूर्लक्ष केलं. मात्र जेव्हा माझ्या पत्नीने सकाळी दरवाजा उघडताच समोर मगर दिसली. ती जोरात किंकाळली, अशी माहिती साबू यांनी द हिंदूशी बोलताना दिली. ही मगर घरात शिरल्याने घरातील सर्व सदस्यांनी घराबाहेर पळ काढला. मात्र नंतर या मगरीला पकडण्यात यश आलं.
-
आम्ही तातडीने आजूबाजूच्यांना तसेच स्थानिक वन अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. जवळजवळ तीन तासांनी या मगरीला ताब्यात घेण्यात सर्वांना यश आलं. या नदीला नंतर चालकुड्या नदीमध्ये सोडून देण्यात आलं.
-
अथिराप्पिल्ली येथे केरळमधील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला अनेकदा मगरी दिसून येतात. (सर्व फोटो सौजन्य: एएनआय)
Photos: सकाळी घराचा दरवाजा उघडताच आत शिरली मगर अन्…
“माझ्या पत्नीने सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि ती जोरात किंचाळली…”
Web Title: Crocodile comes knocking at kerala family door forest officials rush to rescue it scsg