-
चंद्राबद्दल आपल्या सर्वांना कायमच कुतूहल वाटतं आलं आहे. अगदी त्याच्या उत्पत्तीपासून ते त्यावर पाठवण्यात येणाऱ्या मोहिमांपर्यंत अनेक गोष्टी कायमच चर्चेत असतात. सध्या चंद्र चर्चेत आहे ते पाच डिसेंबर रोजी झालेल्या पोर्णिमेमुळे. आता तुम्ही म्हणाल की काय खास होतं या पोर्णिमेमध्ये. तर खास असं काहीच नव्हतं. मात्र या पोर्णिमेचा चंद्र आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन कसा दिसला यासंदर्भातील काही भन्नाट फोटो International Space Station ने ट्विटवरुन शेअर केले आहेत.
-
महिन्यातून एकदा संपूर्ण चंद्र दिसतो. आणि तो पृथ्वीपासून २५० मैलांवरुन (अंदाजे ४०२ किमी) असा सुंदर दिसतो, अशी कॅप्शन या फोटोंना देण्यात आली आहे.
-
पृथ्वीवरुन चांगल्या कॅमेरांनी टीपलेला चंद्राचा फोटो आतापर्यंत अनेकदा पाहिला असेल मात्र अशाप्रकारे थेट स्पेस स्टेशनमधून पोर्णिमेचा चंद्र कसा दिसतो हे पहिल्यांदाच समोर आलं आहे.
-
अनेकांनी हे फोटो भन्नाट असल्याचं म्हटलं आहे. या फोटोंवर शेकडो लोकांनी कमेंट केल्या असून चंद्राचं हे रुप खरोखरच खूपचं देखणं असल्याचं म्हटलं आहे.
-
सात हजारहून अधिक जणांनी हे फोटो शेअर केले असून ४३ हजारहून अधिक जणांनी ते लाइक केलेत. (सर्व फोटो: Twitter.com/Space_Station वरुन साभार)
साधेसुधे नाहीयेत हे चंद्राचे फोटो; जाणून घ्या सात हजारांहून अधिक जणांनी शेअर केलेल्या या फोटोंची खासियत
जाणून घ्या International Space Station ने या फोटोंबद्दल नक्की काय म्हटलं आहे
Web Title: Full moon captured from international space station 250 miles that is 400 km above earth scsg