Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. nepals private airline flew 69 passengers to wrong destination sas

अन् विमान रस्ता चुकलं! प्रवाशांसह जनकपूरसाठी उड्डाण घेतलं; पण पोहोचलं तब्बल २५५ किमी दूर; नंतर…

Oops: फ्लाइट लँड झाल्यावर प्रवासी झाले हैराण…

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • प्रवाशांना घेऊन उड्डाण घेतलेलं एखादं विमान भलत्याच ठिकाणी पोहोचल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?, पण असाच आगळावेगळा प्रकार खरोखर घडला आहे.
    1/10

    प्रवाशांना घेऊन उड्डाण घेतलेलं एखादं विमान भलत्याच ठिकाणी पोहोचल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?, पण असाच आगळावेगळा प्रकार खरोखर घडला आहे.

  • 2/10

    ही विचित्र घटना नुकतीच नेपाळमध्ये घडली. नेपाळमध्ये जनकपूरला जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या विमानातील प्रवासी विमानातून उतरल्यावर मात्र चांगलेच हैराण झाले. कारण, जनकपूरऐवजी ते पोखरा इथे तब्बल २५५ किलोमीटर दूर पोहोचले होते.

  • 3/10

    (संग्रहित छायाचित्र)

  • 4/10

    या घटनेनंतर बुद्ध एअरचे मॅनेजिंग डायरेक्टर विरेंद्र बहादुर यांनी मोठी चूक झाल्याचं मान्य केलं. तसेच, घटनेची सखोल चौकशी केली जाईल त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून प्रवाशांना नुकसान भरपाई दिली जाईल असं सांगितलं.

  • उड्डाणाआधी फ्लाइट नंबर चेंज केले होते : हवामान खराब असल्याने विमानांच्या उड्डाणांना आधीच उशीर होत होता, अशात बुद्ध एअरच्या अधिकाऱ्यांनी आधी पोखरासाठी विमान सोडण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत विमानांचे नंबर चेंज केले होते. जनकपूर आणि पोखरा जाणाऱ्या विमानांमध्ये 15-20 मिनिटांचं अंतर होतं.
  • 5/10

    हवामान खराब असल्याने पोखरा जाणाऱ्या विमानांना व्हिजुअल फ्लाइट रूल्सप्रमाणे (VFR) दुपारी 3 वाजेपर्यंत उड्डाण घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

  • 6/10

    डेस्टिनेशन बदलल्याची कल्पना पायलटला नव्हती :प्राथमिक रिपोर्ट्सनुसार, फ्लाइट नंबर चेंज केल्यामुळे गोंधळ उडाला. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी( ग्राउंड स्टाफ) पोखरा जाणाऱ्या 69 प्रवाशांच्या फ्लाइट U4505 चा नंबर 'ऑन पेपर' बदलून फ्लाइट U4607 केला.

  • 7/10

    पण, फ्लाइट कॅप्टन आणि को-पायलटला याबाबत कल्पना देण्यात आली नाही. फ्लाइट अटेंडेंटनेही विमानात जनकपूरला उड्डाण घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांना काहीच कल्पना नव्हती. पण, फ्लाइट लँड झाल्यावर मात्र जनकपूरऐवजी पोखरा पोहोचल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले.

  • 8/10

    या घटनेची नेपाळमध्ये जोरदार चर्चा असून बुद्ध एअरविरोधात संताप व्यक्त होत आहे. ग्राउंड स्टाफ आणि पायलटमधील संवादाच्या अभावामुळे ही घटना घडली.

  • 9/10

    (संग्रहित छायाचित्र)

Web Title: Nepals private airline flew 69 passengers to wrong destination sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.