• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. amazing pictures from oymyakon russia the coldest inhabited town on earth scsg

हे आहे जगातील सर्वात थंड गाव… तापमान उणे ७१ डिग्री सेल्सियस; फोटो पाहूनच तुम्हाला भरेल हुडहुडी

साधं घराच्या बाहेर पडलं तरी पापण्यांवर जमा होतो बर्फ

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • यंदा जगभरामध्ये खूप जास्त थंडी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतातील काही ठिकाणांबरोबरच जागातील अनेक शहरांमधील तापमान हे उणे म्हणजेच मायनसमध्ये जातं. (सर्व फोटो Maxim Shemetov/Reuters आणि Twitter वरुन साभार)
    1/26

    यंदा जगभरामध्ये खूप जास्त थंडी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतातील काही ठिकाणांबरोबरच जागातील अनेक शहरांमधील तापमान हे उणे म्हणजेच मायनसमध्ये जातं. (सर्व फोटो Maxim Shemetov/Reuters आणि Twitter वरुन साभार)

  • 2/26

    मात्र तुम्हला आज आम्ही अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत जे वर्षातील बाराही महिने बर्फाच्छादित असतं. येथील तापमान उणे ७१ अंश सेल्सियसपर्यंत जातं.

  • 3/26

    या गावाचं नाव आहे ओम्याकोन. हे गाव आहे रशियामधील सायबेरिया प्रांतामध्ये. 

  • 4/26

    ओम्याकोनमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होते की येथे शेतीच केली जात नाही. 

  • 5/26

    ओम्याकोनमधील नागरिकांचे मुख्य खाणं हे मासे आहेत. येथे शेतकऱ्यांची प्रमुख उपजिविका ही मासेमारी आहे. मात्र येथे मिळणारे मासेही अत्यंत गोठलेल्या स्वरुपात असतात. स्टोगनीना हा येथे सर्वाधिक खाल्ला जाणारा मासा आहे.

  • 6/26

    माशांबरोबर येथील लोकं जिवनसत्व आणि ऊर्जा मिळवण्यासाठी रेनडियर आणि घोड्याचं मांस खातात. अनेकदा जंगलातील लाकडं तोडण्यासाठी गेलेले लोकं गाडीमध्ये बसूनच दुपारचं जेवण करतात. हे जेवण गाडीमध्येच गरम राहतं. बाहेर पडून डबा खाण्याचा प्रयत्न केल्यास जेवणातील अनेक पदार्थ कडक झालेले असतात.

  • 7/26

    हिवाळ्यामध्ये ओम्याकोनमधील मुलं ही तापमान उणे ५० च्या खाली गेल्यास शाळेत जात नाहीत. तापमान उणे ५० च्या खाली गेल्यानंतर शाळा बंद ठेवण्यात येतात. 

  • 8/26

    लहानपणापासूनच येथील मुलांना थंडीमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या सवयी लावल्या जातात. यामध्ये अगदी खाण्याच्यासवयीपासून ते अनेक दैनंदिन सवयींचा सहभाग असतो.

  • 9/26

    थंडीच्या दिवसांमध्ये ओम्याकोन शहरातील सरासरी तापमान हे उणे ४५ ते उणे ५० दरम्यानच असते.

  • 10/26

    ओम्याकोन शहरामध्ये अनेक ठिकाणी तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर लावण्यात आलेत.

  • 11/26

    डिसेंबर महिन्यामध्ये ओम्याकोन शहरात प्रंचड थंडी असते. या महिन्यात सकाळी दहा वाजता सूर्यदर्शन होतं.

  • 12/26

    अंटार्टिका वगळता जगातील सर्वात थंड जागा म्हणून ओम्याकोनला ओळखलं जातं. 

  • 13/26

    १९२४ साली ओम्याकोनमधील तापमान उणे -७१.२ अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं होतं.

  • 14/26

    २०१८ च्या आकडेवारीनुसार ओम्याकोनमध्ये ५०० ते ९०० लोकं राहतात.

  • 15/26

    जगलांमधील झाडं कापणं आणि कापलेल्या लाकडाची विक्री करणं हा ओम्याकोनमधील नागरिकांच्या उपजिवकेच्या प्रमुख साधनांपैकी एक आहे.

  • 16/26

    ओम्याकोनमध्ये  गाड्या चालवणंही अत्यंत कठीण आहे. येथे सतत बर्फ पडत असल्याने अनेकदा गाड्यांवर बर्फाची चादर असते.

  • 17/26

    अनेकदा गाडी घेऊन बाहेर जाण्याच्या काही तास आधीपासूनच तिचं इंजिन गरम होण्यासाठी ती सुरु करुन ठेवावी लागते. रात्री हे असं दृष्य गाडी चालवताना दिसतं.

  • 18/26

    अनेकदा मुख्य बर्फ नसणाऱ्या रस्त्यापर्यंत पोहचण्यासाठी चारचाकी गाड्यांना दोन दिवस लागतात. 

  • 19/26

    जून आणि जुलै महिन्यामध्ये जगभरातील अनेक शहरांमध्ये भयंकर ऊन पडतं तेव्हा येथील तापमान हे उणे २० डिग्री असतं.

  • 20/26

    विरोधाभास सांगायचा झाल्यास ओम्याकोन या नावाचा स्थानिक भाषेतील अर्थ होतो न गोठलेलं पाणी म्हणजेच अनफ्रोजन वॉटर.

  • 21/26

    ओम्याकोनमध्ये तुम्हाला घराबाहेर ठेवलेली एकही अशी वस्तू सापडणार नाही जिच्यावर बर्फ जमलेला नाही.

  • 22/26

    ओम्याकोनमधील रस्त्यांवरील सिग्नलची ही अवस्था पाहा.

  • 23/26

    हे ओम्याकोनमधील पार्क म्हणजेच बगिचा आहे. येथे बँका, शाळा असा नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आहेत.

  • 24/26

    ओम्याकोनमध्ये हे असं दृष्य अगदीच नेहमीचं आहे.

  • 25/26

    थंडीच्या महिन्यांमध्ये थेथे डोळ्यांच्या पापण्यांवरही बर्फ साचतो.

  • 26/26

    ओम्याकोनमध्ये सणांच्या वेळेला बर्फापासूनच अशा कलाकृती साकारल्या जातात. या शहराला द पोल ऑफ कोल्ड नावानेही ओळखलं जातं.

Web Title: Amazing pictures from oymyakon russia the coldest inhabited town on earth scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.