-
केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियामध्ये गव्हाच्या गोण्यांचे काही फोटो व्हायरल होत असून या गोण्यांवर जिओचा लोगो असल्याचं दिसतंय.
-
एनएसयूआयचे(NSUI) सोशल मीडिया प्रमुख मनोज लुबाना यांनीही जिओचा लोगो असलेल्या गव्हाच्या गोण्यांचे फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियामध्ये जिओच्या गव्हाच्या गोण्यांचे फोटो व्हायरल झाल्यापासून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
शेतकऱ्यांकडून १७ रुपये किलो दराने गहू खरेदी करुन तुम्हाला ५० रुपये किलोने विक्री केली जात आहे. यामुळेच कृषी कायदे रद्द केले जात नाहीयेत, असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर, नवीन कृषी कायदे आल्यापासून जिओने गव्हाचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून येत्या दिवसांमध्ये गव्हाच्या किंमती प्रचंड वाढतील, यामुळे कृषी कायदे रद्द केले जात नाहीत असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.
-
मात्र, फॅक्ट चेकनंतर गव्हाच्या गोण्यांचे जे फोटो सोशल मीडियात शेअर होत आहेत त्यांचा जिओशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण गोण्यांवर जिओचा जो लोगो वापरण्यात आला आहे त्याचा फॉन्ट जिओच्या मूळ लोगोपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे व्हायरल होणारे फोटो फेक असल्याचं स्पष्ट होत आहे. ( सर्व फोटो – ट्विटर )
Jio १७ रुपये किलो गहू विकतंय ५० रुपयांना? शेतकरी आंदोलनादरम्यान व्हायरल होणाऱ्या फोटोचं सत्य काय?
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सोशल मीडियामध्ये Jio च्या गव्हाच्या गोण्यांचे फोटो…
Web Title: Viral images of jio bags of wheat on social media check details sas