• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. florida braced for unusually cold christmas and falling iguanas scsg

सावध राहा… झाडांवरुन सरड्यांचा पाऊस पडू शकतो; हवामान खात्यानेच दिला इशारा

यासंदर्भात थेट ट्विटरवरुन माहिती देण्यात आलीय

December 28, 2020 13:03 IST
Follow Us
  • अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील हवामान खात्यातील तज्ज्ञांनी झाडांवरुन सरड्यांचा पाऊस (Iguanas Falling) पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
    1/11

    अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील हवामान खात्यातील तज्ज्ञांनी झाडांवरुन सरड्यांचा पाऊस (Iguanas Falling) पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • 2/11

    मोठ्या आकाराचे सरडे झाडावरुन पडू शकतात असा इशाराच फ्लोरिडा राज्यातील नागरिकांना यासंदर्भातील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 3/11

    दक्षिण फ्लोरिडामधील तापमानामध्ये मागील काही दिवसांपासून कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे शीत रक्त गटातील प्राणी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सरड्यांवर या थंड वातावरणाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 4/11

    जास्त थंडी पडल्यास या सरड्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि त्यांच्या शरीरातील ताळमेळ बिघडतो. अशावेळी हे सरडे झाडांवरुन फळांप्रमाणे खाली पडतात. हे सरडे जिवंत असले तरी ते निर्जीव असल्याप्रमाणे झाडावरुन खाली पडताना दिसतात. सध्याची थंडी पाहता असा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असं तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं वृत्त द गार्डीयनने दिलं आहे.

  • 5/11

    थंडीच्या कालावधीमध्ये ऊब मिळवण्यासाठी काही प्रजातीचे सरडे जमीनीमध्ये बिळं खोदतात. मात्र त्यामुळेही मोठं नुकसान होतं. या सरड्यांमुळे आता थंडीमुळे हैराण झालेल्या फ्लोरिडामधील नागरिकांना रस्त्यावर सरडे पडण्याच्या आणखीन एका संकटाला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.

  • 6/11

    मियामीमधील राष्ट्रीय हवामान सेवा केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार या भागातील तापमान झापट्याने कमी होत असून त्यामुळे हे सरडे झाडावरुन खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 7/11

    यासंदर्भात मियामीमधील राष्ट्रीय हवामान सेवा केंद्राने ट्विटरवरुनही इशारा दिला आहे. "सरड्यांचा विचार असो किंवा नसो ते उद्या सकाळी झोपेत असतील अशी शक्यात दिसत आहे. तसेच सरडे झाडावरुन पडताना दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका कारण तापमान कमी झालं आहे," असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • 8/11

    रेप्टाइल्स म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडणाऱ्या सरड्यांना थंड हवामान सहन होत नाही असं सांगितलं जातं.

  • 9/11

    त्यामुळेच थंडी वाढल्यास सरड्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. ते श्वास घेऊ शकत नाही असं वाटू लागते. मात्र ते जिवंत असतात.

  • 10/11

    सामान्यपणे जास्त थंडी पडल्यावर सरडे पाठवण्याच्या ठिकाणी धाव घेतात.

  • 11/11

    युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाच्या माहितीनुसार फ्लोरिडामध्ये तीन हजारांहून अधिक सरडे आहेत. (सर्व फोटो : रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)

Web Title: Florida braced for unusually cold christmas and falling iguanas scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.