-
गर्लफ्रेंडला प्रपोज करायचं असेल, तर मनाला भुरळ घालणाऱ्या उंच पर्वतांपेक्षा चांगलं ठिकाण दुसरं कुठलंही नाही, असं म्हणतात . आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी प्रियकराने अनोख्या क्लृप्त्या वापरल्याच्या अनेक बातम्या ऐकायला येत असतात. रॉमँटिक प्रपोज करण्यासाठी लढवलेली शक्कल बघून अनेकदा हसू आवरणं कठीण होतं, तर अनेकदा आश्चर्यही वाटतं. पण एका प्रेमीयुगूलाने लग्नाच्या प्रपोजसाठी असा काही मार्ग अवलंबला की मनात धस्स होईल.
-
ऑस्ट्रियामधील एका प्रेमी युगूलासोबत काही दिवसांपूर्वी एक भयानक घटना घडली. 27 वर्षांच्या प्रियकराने त्याच्या 32 वर्षांच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी Carinthia येथील फवकार्ट ( Falkart mountain )नावाच्या उंच पर्वताची निवड केली.
-
सुर्यास्ताच्या वेळी पर्वतावर पोहोचल्यावर दोघंही खूश होते. प्रियकराने तिला लग्नाची मागणी घातली, तिनेही लागलीच होकार दिला. पण, तरुणीने होकार देताच तिचा पाय सटकला आणि ती थेट ६५० फूट खोल दरीत कोसळली.
-
प्रेयसी दरीत पडल्यानंतर क्षणाचाही विचार न करता प्रियकरानेही दरीत उडी घेतली. पण तो 50 फूट खोल जाऊन कशालातरी धडकल्यामुळे तिथेच लटकून राहिला. (घटनास्थळावरील बचावकार्यादरम्यानचा फोटो, सौजन्य : Alpin-1 Notarzthubschrauber/ Facebook)
-
पण, आश्चर्य म्हणजे ६५० फूट खाली कोसळल्यानंतरही तरुणीचा जीव वाचला. कारण ती खाली ज्या रस्त्यावर पडली होती तो रस्ता बर्फाने आच्छादला होता. बर्फाच्या चादरीवर पडल्याने ती वाचली. थोड्यावेळाने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला बघितल्यावर पोलिसांना माहिती दिली व महिलेचा जीव वाचवण्यात आला. तर ५० फूट अंतरावर लटकलेल्या प्रियकराच्या बचावासाठी हेलिकॉप्टर बोलवावं लागलं, त्यानंतर त्यालाही वाचवण्यात आलं. तरुणाच्या मणक्याला जखम झाली असून त्याला फ्रॅक्चर करण्यात आलं आहे. तर बर्फाने आच्छादलेल्या रस्त्यावर पडल्याने तरुणीला मात्र जास्त इजा झालेली नाही. दोघांवरही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, 'अंत भला तो सब भला' असं आपल्याकडे म्हटलं जातं. या घटनेतही दोघांचा जीव वाचलाय. पण यामुळे कुठेही अतिसाहस दाखवू नये हा धडा मात्र प्रत्येकाला नक्कीच शिकवलाय. (घटनास्थळावरील बचावकार्यादरम्यानचा फोटो, सौजन्य : Alpin-1 Notarzthubschrauber/ Facebook)
रॉमँटिक प्रपोजचं रुपांतर भीषण अपघातात, ‘हो’ बोलताच 650 फूट खोल दरीत कोसळली तरुणी; तरीही…
प्रियकराने लग्नाची मागणी घालताच तिनेही होकार दिला. पण पुढच्याच क्षणी तिचा पाय सटकला; तरीही….
Web Title: Woman falls 650 ft down cliff after saying yes on the propose from boyfriend sas