• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. rajgir glass bridge this magnificent glass skywalk bridge has been built in bihar scsg

लंडन किंवा बिजिंग नाही तर बिहार… होय, बिहारमध्ये आहे हा अंगावर रोमांच उभा करणारा ग्लास ब्रिज

जाणून घ्या नक्की कुठे आहे हा ग्लास ब्रिज आणि काय खास आहे त्यामध्ये

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • भारतामधील दुसरा ग्लास ब्रिज म्हणजेच काचेपासून बनवण्यात आलेला पूल हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे बांधला जात आहे.
    1/12

    भारतामधील दुसरा ग्लास ब्रिज म्हणजेच काचेपासून बनवण्यात आलेला पूल हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे बांधला जात आहे.

  • 2/12

    वन विभागाच्या माध्यमातून एका सफारीचा भाग म्हणून हा पूल बांधण्यात येत आहे. हा ब्रिज चीनमधील हँगझोऊ ब्रिजप्रमाणे बांधला जाणार असून त्यावरुन समोरचे डोंगर पाहण्याबरोबरच दरीत डोकावण्याचा आगळा वेगळा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

  • 3/12

    नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी भेट दिली होती.

  • 4/12

    यावेळी नितीश कुमार यांनी राजगीरमधील या ग्लास ब्रिज प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेतली.

  • 5/12

    नितीश कुमार यांनी या प्रकल्पाची रचना कशी आहे तो कसा उभारला जाणार आहे हे तेथील अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं.

  • 6/12

    नितीश कुमार यांनी या पुलाच्या मजबुतीसंदर्भातील माहितीही अधिकाऱ्यांकडून घेतली.

  • 7/12

    नितीश कुमार यांनी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन मार्च २०२१ पर्यंत पर्यटकांसाठी खुला होईल अशी माहिती या ब्रिजची पहाणी केल्यानंतर दिली होती.

  • 8/12

    राजगीरमधील हा ग्लास ब्रिज २०० फूट उंच असून ८५ फूट लांब तर ६ फूट रुंद असणार आहे.

  • 9/12

    एका वेळेस ४० पर्यटक या पुलावर जाऊ शकणार आहेत. हा ब्रिज मजबूत केबल्स आणि साखळ्यांनी बांधण्यात आलाय.

  • 10/12

    राजगीर हे गौतम बुद्धांचा ऐतिहासिक वारसा असणारं शहर म्हणून लोकप्रिय असून हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळही आहे. या ठिकाणी निसर्ग दर्शन आणि रोप वे सायकलिंगसारख्या गोष्टींचीही निर्मिती करण्यात आली आहे.

  • 11/12

    बिहार सरकारने स्कायवॉक प्रकल्प उभारण्यासाठी ५०० एकर जमीन दिली आहे. याच जमीनीवर सध्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प उभारले जात आहेत.

  • 12/12

    बिहारमधील हा ग्लास ब्रिज अशाप्रकारचा देशातील दुसरा ग्लास ब्रिज आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा असा ब्रिज उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये बांधण्यात आलाय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Web Title: Rajgir glass bridge this magnificent glass skywalk bridge has been built in bihar scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.