-
सोशल मीडियावर सध्या एका गावाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत. फोटो बघून पहिल्या नजरेत हे युरोपातलं एखादं सुंदर शहर वाटतंय, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. नेटकऱ्यांकडून पार्कमधील डिझाइनर पाथ-वे आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं विशेष कौतुक होतंय.
-
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण युरोपातल्या शहराप्रमाणे दिसणारं हे केरळमधील एक उद्यान (पार्क) आहे. केरळमधल्या कोझीकोडे जिल्ह्यातील करक्कड गावात अलिकडेच नवीन पार्क तयार करण्यात आलं आहे.
-
करक्कड गावातील 'वागभंटानंद पार्क'चे हे फोटो आहेत. केरळचे पर्यटन मंत्री कदकमप्ली सुरेंद्रन यांच्याहस्ते अलिकेडेच या शानदार पार्कचं उद्घाटन झालं आणि लगेचच पार्कचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झाली. सध्या हे उद्यान सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलंय.
-
डिझाइन ठरवण्यापासूनच गावातल्या स्थानिकांचा या उद्यानाच्या नूतनीकरणामध्ये सक्रीय सहभाग होता. स्थानिकांची मतं विचारात घेऊनच नूतनीकरणाचे काम केले गेले असे सुरेंद्रन यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले.
-
केवळ स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि सक्रीय सहभागामुळेच हे शक्य झालं असंही सुरेंद्रन यांनी नमूद केलं. कदकमप्ली सुरेंद्रन यांनी या गावाचे जुने म्हणजे नूतनीकरण होण्यापूर्वीचे आणि नूतनीकरण झाल्यानंतरचेही काही फोटो शेअर केलेत.
-
सामाज सुधारक वागभटानंद गुरूंच्या सन्मानार्थ हे उद्यान तयार करण्यात आले आहे.
-
२. ८० कोटी रुपये खर्च करुन वागभटानंद यांनी स्थापना केलेल्या उरलुंगल लेबर कॉन्ट्रॅक्टर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीने (यूएलसीसीएस) उद्यानाचे बांधकाम केले आहे.
-
पार्कमध्ये स्टेच्यू, ओपन स्टेज, बॅडमिंटन कोर्ट, जिम आणि लहान मुलांसाठी वेगळं चिल्ड्रन पार्क आहे. पार्कमधील रस्ते दिव्यांगांचा विशेष विचार करुन बांधण्यात आलेत. रस्त्यावर आणि शौचालयांमधील टाइल्स अंध व्यक्तींचा विचार करुन लावण्यात आलेत.
-
पार्कमधील डिझाइनर पाथ-वे आणि मॉडर्न आर्किटेक्चर नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस पडलंय.
-
सोशल मीडियावर नेटकरी हे फोटो पाहून उद्यानाच्या जणू काही प्रेमातच पडलेत. या उद्यानाचं एकूणच आर्किटेक्चर स्थानिकांसोबत नेटकऱ्यांच्याही खूप पसंतीस पडत असून लोकं त्यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. फोटो पाहून अनेक नेटकरी भलतेच उत्साहित झालेत. पार्कला भेट देण्यासाठी आता जास्त वाट बघवत नाही, अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. एक नजर मारुया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांवर :
-
Omg…हे किती सुंदर आहे.
-
ही जागा म्हणजे एखादं आंतरराष्ट्रीय ठिकाण असल्याप्रमाणे वाटतंय.
-
केरळला भेट देण्याचं अजून एक कारण
-
हे तर सिंगापूरप्रमाणे दिसतंय
-
क्षणभरासाठी युरोपातलं एखादं गाव वाटलं…आशा आहे की मी एखाद्या दिवशी या जागेला भेट देईन!
-
महामारी संपल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी जाणार
-
हे भारतातलं गाव आहे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. युरोपातल्या एखाद्या सुंदर शहराप्रमाणे कदाचित सिंगापूरप्रमाणे हे गाव आहे.
काय सांगता! युरोपातलं शहर नव्हे, हे आपलंच गाव; फोटो पाहून नाही बसत कोणाचा विश्वास
डिझाइनर पाथ-वे आणि मॉडर्न आर्किटेक्चर कौतुकाचा विषय…
Web Title: Not european city but kerala park photos of newly built vagbhatananda park impresses people online sas