• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. om birla member of parliament lok sabha daughter anjali birla civil services exam selection bmh

लोकसभा अध्यक्षांची मुलगी पहिल्याच प्रयत्ना बनली IAS; एक वर्ष अशी केली तयारी

१० ते १२ तास करायची अभ्यास

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • मागील काही दिवसांपासून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आनंदाची बातमी म्हणजे लोकसभा अध्यक्षांची लहान मुलगी अंजली बिर्ला आयएएस बनली आहे. (photos:anjalibirla/instagram)
    1/10

    मागील काही दिवसांपासून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. आनंदाची बातमी म्हणजे लोकसभा अध्यक्षांची लहान मुलगी अंजली बिर्ला आयएएस बनली आहे. (photos:anjalibirla/instagram)

  • 2/10

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सीए आहे. लहान मुलगी आता UPSC उत्तीर्ण झाली आहे.

  • 3/10

    दहावीत चांगले गुण मिळनही अंजलीने विज्ञान शाखेऐवजी कला शाखेला प्रवेश घेतला होता. तिच्या या निर्णयाचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं.

  • 4/10

    महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अंजलीने आयएएस बनण्याचा निश्चय केला होता. कोटातील सोफिया महाविद्यालयातून अंजलीने १२वी पूर्ण केली.

  • 5/10

    त्यानंतर दिल्लीतील रामजस महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर एक वर्ष दिल्लीत राहून अंजलीने युपीएससी परीक्षेची तयारी पूर्ण केली.

  • 6/10

    अंजलीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलं. आपल्या या यशाचं श्रेय अंजली मोठी बहिण आकांक्षा हिला देते.

  • 7/10

    आकांक्षाने शिकवलं आणि प्रत्येकवेळी प्रोत्साहित केलं. प्रत्येक वेळी आकांक्षा आपल्यासोबत होती. यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठीही खूप मदत केली आणि माझा उत्साह वाढवला, असं अंजली सांगते.

  • 8/10

    प्रत्येक दिवशी १० ते १२ तास परीक्षेची तयारी करायचे, असं अंजली सांगते. अंजलीने परीक्षेसाठी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे दोन विषय घेतले होते.

  • 9/10

    "वडील राजकारणात आहेत, तर आई वैद्यकीय क्षेत्रात आहे. कुटुंबातील प्रत्येकजण कोणत्यातरी क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यामुळेच वेगळ्या दृष्टीकोणातून युपीएससीचा पर्याय निवडला, असं अंजली सांगते.

  • 10/10

    अंजलीच्या यशामुळे तिची आई अमिता बिर्ला या खूप आनंदी आहेत. अंजली लहानपणापासूनच उशार आहे. ती प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी कष्ट घेते, असं त्या म्हणाल्या.

Web Title: Om birla member of parliament lok sabha daughter anjali birla civil services exam selection bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.