-
चीनच्या वायव्येमधील गुइझाउ प्रांतामध्ये घटस्फोटाचे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. एका नवविवाहित महिलेने लग्नाच्या हॉलवरच घटस्फोटाची मागणी केलीय.
-
पतीने आपल्याला भेट म्हणून दोन साइट छोट्या आकाराची ब्रा गिफ्ट केल्याने आपल्याला घटस्फोट हवा असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.
-
ब्राची साईज पाहून संतापलेल्या या महिलेने गिफ्ट पाहिल्यानंतर राग अनावर झाल्याने लग्नसमारंभामध्येच गोंधळ घातला.
-
या महिलेने सामुहिक जेवणाच्या हॉलमधील विजपुरवठा खंडित केला. या महिलेने मला तातडीने घटस्फोट हवा असल्याची मागणी लग्न आयोजित करण्यात आलेल्या हॉमध्येच केल्याचे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
खरं तर या जोडप्याचं लग्न काही काळापूर्वीच पार पडलं आहे. मात्र करोनामुळे अगदी साध्या पद्धतीने लग्न झाल्यामुळे आपल्या जवळच्या कुटुंबियांबरोबरच मित्रपरीवाराच्या उपस्थितीत लग्न करावे या इच्छेने या दोघांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
-
लग्न झाल्यापासून दोघेही आनंदाने संसार करत होते. मुलाचे अडनाव यांग असून मुलीचे अडनाव लुओ असं आहे.
-
मात्र नियोजित पद्धतीने इच्छेनुसार लग्नसमारंभ पार पडल्यानंतर त्याच हॉलवर आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशन पार्टीत नवऱ्याने नवरीला खास गिफ्ट दिलं.
-
नवरीने उत्साहाने हे गिफ्ट उघडून पाहिलं तर बॉक्समध्ये अंतर्वस्त्रं (लाँजरी) होती. मात्र या अंतर्वस्त्रांची साईज योग्य नव्हती.
-
नवऱ्याने भर पार्टीमध्ये अंतर्वस्त्रं भेट म्हणून दिली आणि ती मुद्दाम छोट्या आकाराची देत आपला अपमान केल्यासारखं वाटल्याने नवरीमुलगी भयंकर संतापली.
-
माझ्या पतीला माझ्या ब्राची साईज ठाऊक होती तरी मुद्दाम त्याने चारचौघात माझी मस्करी करण्यासाठी मला छोट्या आकाराची अंतर्वस्त्रं भेट दिली असा अरोप या महिलेने केला आहे.
-
लग्न समारंभाच्या वेळेस माझा असा अपमान करणारी व्यक्ती भविष्यात माझी कशी काळजी घेणार, असा प्रश्न उपस्थित करत या मुलीने थेट घटस्फोटाची मागणी केली.
-
सध्या चीनमधील सोशल नेटवर्किंग साईटवर या लग्नाच्या पार्टीमधील गोंधळाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावर अनेकांनी या तरुणीने मांडलेला मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे.
-
या प्रकरणामध्ये आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी आहोत अशी भूमिका लुओ कुटुंबियांनी घेतली आहे.
-
पार्टीच्या सुरुवातीलाच हा गोंधळ झाल्याने मुलीकडच्या नातेवाईकांनी पार्टीमधून काढता पाय घेतला. मात्र मुलगी घटस्फोटाची धमकी देऊन निघून गेल्यानंतरही मुलाकडची मंडळी पार्टी करताना दिसली.
-
या अंतर्वस्त्रांमुळे मोडलेल्या लग्नाची चीनमधील सोशल मिडियावर चर्चा असून दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांचं या मुलीच्या म्हणण्याला पाठींबा असला तरी काहींनी थेट घटस्फोटापर्यंत प्रकरण गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: रॉयटर्स)
नवऱ्याने छोट्या साईजचा ब्रा गिफ्ट केल्याने नवरीने लग्नाच्या हॉलमध्येच मागितला घटस्फोट
या तरुणीने गिफ्ट पाहिल्यानंतर लग्नाच्या हॉलवर गोंधळ घातला
Web Title: Newlywed seeks divorce after her beau bra size boob she takes his wedding gift of lingerie two sizes too small as disrespectful scsg