Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. industrialist ratan tata on chhotu comment of girl instagram sgy

‘छोटू’ म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलं उत्तर; कमेंट करणाऱ्या मुलीलाही वाटली लाज

यशाचं शिखर गाठल्यानंतरही अत्यंत साधेपणाने आयुष्य जगणारे रतन टाटा अनेक उद्योजक तसंच तरुणांसाठी आदर्श आहेत

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • यशाचं शिखर गाठल्यानंतरही अत्यंत साधेपणाने आयुष्य जगणारे रतन टाटा अनेक उद्योजक तसंच तरुणांसाठी आदर्श आहेत. (Photos: Instagram)
    1/13

    यशाचं शिखर गाठल्यानंतरही अत्यंत साधेपणाने आयुष्य जगणारे रतन टाटा अनेक उद्योजक तसंच तरुणांसाठी आदर्श आहेत. (Photos: Instagram)

  • 2/13

    एक यशस्वी उद्योजकच नाही तर एक उत्तम व्यक्ती म्हणून रतन टाटा नावाजले जातात. समाजकार्यातही ते पुढे असतात. जेव्हा कधी मुंबई, महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हा मदतीसाठी पुढे येणाऱ्यामध्ये रतन टाटा पहिले असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

  • 3/13

    रतन टाटा यांचे किस्से, जुने फोटो हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असतो.

  • 4/13

    सोशल मीडियावरही रतन टाटा यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

  • 5/13

    रतन टाटा यांचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याच आनंदात त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर युजर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला होता.

  • 6/13

    यावेळी एका तरुणीने रतन टाटांच्या पोस्टवर 'छोटू' अशी कमेंट केली. यानंतर या तरुणीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

  • 7/13

    यावेळीही रतन टाटा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत तरुणीला ट्रोल होण्यापासून वाचवलं आणि खूप शांतपणे, प्रेमाने उत्तर दिलं. (PTI)

  • 8/13

    रतन टाटा यांनी उत्तर देत म्हटलं की, प्रत्येकामध्ये एका लहान मुलाची लक्षणं असतात. कृपया मुलीसोबत आदराने वागा.

  • 9/13

    एका निरागस मुलीने मला 'छोटू' म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं.

  • 10/13

    मात्र रतन टाटा यांच्यावर अशा पद्दतीची कमेंट केल्याने तरुणीला मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हावं लागल. यावरुनच रतन टाटा यांचे किती मोठ्या प्रमाणात चाहते आहेत हे लक्षात येतं.

  • 11/13

    अखेर त्या तरुणीला आपली कमेंट डिलीट करावी लागली. (PTI)

  • 12/13

    रतन टाटा यांनी यावर तरुणीच्या भावनांचा आदर करत पुन्हा एकदा ती अशा पद्धतीने कमेंट करेल अशी आशा व्यक्त केली.

  • 13/13

    रतना टाटा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं होतं. तेव्हापासून दिवसेंदिवस त्यांचे फॉलोअर्स वाढत आहेत.

Web Title: Industrialist ratan tata on chhotu comment of girl instagram sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.