Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. china has revealed a prototype for a new high speed maglev train that can speeds up to 620 kmph scsg

Photos: ‘ही’ आहे ताशी ६२० किमी वेगाने धावणारी ट्रेन; फोटो पाहून व्हाल थक्क

या ट्रेनला फ्लोटींग ट्रेन असं म्हणतात, कारण…

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • चीनमध्ये जगाच्या तुलनेत सर्वात जलद ट्रेन्सचं जाळं आहे. चीनमधील वेगवान रेल्वेचं जाळ ३७ हजार किलोमीटर लांबीचं आहे. जगात सर्वात वेगाने धावणारी कमर्शियल ट्रेन शंघाय मगलेव ही ट्रेनही याच नेटवर्कमधील आहे. मात्र आता चीनने हाय स्पील मगलेव ट्रेनचा प्रोटोटाइप सादर केलं आहे.
    1/15

    चीनमध्ये जगाच्या तुलनेत सर्वात जलद ट्रेन्सचं जाळं आहे. चीनमधील वेगवान रेल्वेचं जाळ ३७ हजार किलोमीटर लांबीचं आहे. जगात सर्वात वेगाने धावणारी कमर्शियल ट्रेन शंघाय मगलेव ही ट्रेनही याच नेटवर्कमधील आहे. मात्र आता चीनने हाय स्पील मगलेव ट्रेनचा प्रोटोटाइप सादर केलं आहे.

  • 2/15

    ही मगलेव ट्रेन तासाला ६२० किमी अंतर पार करु शकते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या ट्रेनचा ताशी वेग ६२० किमी प्रती तास इतका आहे.

  • 3/15

    ही मगलेव ट्रेन हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिंग पॉवरवर चालते. ही ट्रेन चुंबकीय ट्रॅक्सवर तरंगत प्रवास करत असल्यासारखा भास होतो. त्यामुळे या ट्रेनला फ्लोटिंग ट्रेन असंही म्हटलं जातं.

  • 4/15

    मगवेल ट्रेन ही चीनसारख्या मोठ्या आकाराच्या देशामध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमान प्रवासाला एक चांगला पर्याय ठरु शकते. चीनमध्ये विमानांचा जास्तीत जास्त वेग हा ९०० किमी प्रती तास इतका आहे. 

  • 5/15

    या ट्रेनचं २१ मीटर लांबीचं प्रोटोटाइप प्रसारमाध्यमांसमोर चेंगडू येथे सादर करण्यात आलं. यूनिव्हर्सिटी रिसर्चर्सने एक १६५ मीटर लांबीचा ट्रॅक बनवाल असून त्यावर ट्रेनचा लूक आणि ट्रेनमध्ये बसल्यावर कसा अनुभव असेल हे दाखवणारी प्रोटोटाइप ट्रेन तयार केली आहे.

  • 6/15

    प्रोटोटाइपवर काम करणारे प्राध्यापक चुआन यांचं म्हणणं असं आही की ही ट्रेन तीन ते १० वर्षांच्या कालावधीमध्ये कार्यरत होईल. त्यांनी सिचुआनकडे काही दुर्मिळ साधनसंपत्ती आहे जी स्थायी स्वरुपाचे चुंबकीय ट्रॅक निर्माण करण्यासाठी फयद्याचे ठरु शकतात असाही दावा केला जातोय. 

  • 7/15

    चीनमधील सर्वात वेगवान ट्रेन्स असणाऱ्या मगलेव २००३ पासून चावल्या जात आहेत. या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा ४३१ किमी प्रती तास इतका आहे ही ट्रेन शांघायमधील पुडोन्ग विमानतळाला शंघायच्या पूर्वेकडील लॉन्गयाग रोडशी जोडते.

  • 8/15

    चीनमध्ये २०२२ पर्यंत जास्तीत जास्त मूलभूत सेवा निर्माण करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवलं आहे. हिवाळी ऑलिम्पिकचे बीजिंगमध्ये आयोजन करण्यात आलं असल्याने मुख्य शहराला जोडण्यासाठी मूलभूत सेवा उभारण्यासाठी चीन वेगाने काम करत आहे.

  • 9/15

    याच महिन्यामध्ये चीनमध्ये विशेष बुलेट ट्रेन सेवा सुरु करण्यात आली आहे. या ट्रेन कमी तापमान असणाऱ्या प्रदेशातही योग्य पद्धतीने चालू शकतात. सीआर ४०० एएफ-जी नावाच्या या ट्रेन ३५० किमी प्रती तास वेगाने उणे ४० डिग्री तापमानामध्येही चालू शकते. 

  • 10/15

    चीन ज्या पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सेवा निर्माण करत आहे त्या सेवांचा फायदा औद्योगिकरणासाठी करुन घेण्याचा विचार करत आहे. मात्र यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या करणं आवश्यक असून यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात.

  • 11/15

    चाचण्या केल्यानंतरच या ट्रेन्सचा व्यवसायिक वापर करता येऊ शकतो. चीनला २०२५ पर्यंत ५०० किमी प्रती तास वेगाने चालणाऱ्या ट्रन्सचा व्यवसायिक दृष्टीकोनातून वापर करायचा आहे. 

  • 12/15

    चीनमध्ये ६०० किमी प्रती तास वेगाने धावणाऱ्या हाय स्पीड मगलेव ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर २०१६ पासून सुरु करण्यात आला. हा प्रकल्प चीनच्या विज्ञान आणि प्रद्यौगिक मंत्रालयाच्या अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पांअंतर्गत राबवण्यात आला.

  • 13/15

    वेग, सुरक्षा, विश्वासार्हता, जास्त प्रवासी क्षमता, वक्तशीरपणा, पर्यावरणपूरक, किमी देखरेखीचा खर्च ही सगळी हाय स्पीड मगलेव ट्रेन्सची वैशिष्ट्ये आहेत.

  • 14/15

    वेगवान ट्रेन्सचे ट्रॅक आणि मूलभूत सेवा उभारण्यामागे चीनने १५०० किमी लांबीचे अंतर लवकरात लवकर कापता यावे या उद्देशाने पर्यायी सेवा निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे. बीजिंग शंघायदरम्यानचे १२०० किमीचे अंतर कमी वेळेत कापण्याच्या हेतूने चीन आता काम करत आहे. 

  • 15/15

    सध्या विमानाने हा प्रवास कऱण्यासाठी साडेचार तासांचा वेळ लागतो तर सध्याच्या ट्रेनने हा वेळ पाच तासांचा आहे. मात्र मगलेव ट्रेन्समुळे हे अंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये कापता येईल. (सर्व फोट ट्विटरवरुन साभार)

Web Title: China has revealed a prototype for a new high speed maglev train that can speeds up to 620 kmph scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.