-
थंडीच्या दिवसांमध्ये अंघोळ करण्यास अनेकजण कंटाळा करतात. परदेशात तर थंड वातावरणामुळे अंघोळ टाळण्याला प्राधान्य असतं. थंडीमध्ये पाण्यापासून दूर राहण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. मात्र जगामध्ये एक व्यक्ती अशी आहे जीने मागील ६७ वर्षांपासून एकदाही अंघोळ केलेली नाही. (सर्व फोटो : इराण रिपब्लिक न्यूज एजन्सी आणि सोशल नेटवर्किंगवरुन)
-
अमो हाजी असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने मागील साडेसहा दशकांमध्ये साधं आपलं तोंडही धुतलेलं नाही. या व्यक्तीचं वय ८७ वर्ष असून त्याने वयाच्या २० व्या वर्षापासून एकदाही अंघोळ केलेली नाही.
-
इराणच्या दक्षिणेला असणारा देगाह गावामध्ये अमो राहतात. त्यांच्या संपूर्ण शरीरावर धूळ आणि राख जमल्यासारखं वाटतं. एखाद्या धुराच्या नळकांड्यामधून बाहेर आल्यानंतर ज्याप्रमाणे त्वचा काळवंडल्यासारखी वाटते तशी अमो यांची त्वचा आहे.
-
अमो यांना पाण्याची प्रचंड भीती वाटते. म्हणूनच ते मागील ६७ वर्षांपासून एकदाही अंघोळ केलेली नाही. आपण अंघोळ केली तर आजारी पडू असं अमो यांना वाटतं. शरीर स्वच्छ ठेवल्यास त्या स्वच्छतेमुळेच आपण आजारी पडू असा अमो यांचा समज आहे.
-
अमो यांचं रहाणीमानही अगदी विचित्र आहे. त्यांना जानवरांचं सडलेलं मांस खायला आवडतं. खास करुन त्यांना साळींद्राचं मांस त्यांना विशेष आवडतं. अमो एकाच वेळी पाच सिगारेट पितात.
-
अमो यांचं रहाणीमानही अगदी विचित्र आहे. त्यांना जानवरांचं सडलेलं मांस खायला आवडतं. खास करुन त्यांना साळींद्राचं मांस त्यांना विशेष आवडतं. अमो एकाच वेळी पाच सिगारेट पितात.
-
अमो यांना धुम्रपानाची आवड आहे. मात्र त्यांची धुम्रपान करण्याची पद्धतही अगदी किळसवाणी आहे. ते आपल्या एका जुन्या सिगारसारख्या पाईपमध्ये प्राण्यांचा सुकलेला मैला जाळून त्या सिगारचा धुम्रपानासाठी वापर करतात.
-
अमो हाजी हे थंडीपासून वाचण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घालून फिरत असतात. ते आगीच्या मदतीनेच आपल्या शरीरावरील केस कापतात.
-
पाण्याची भीती वाटत असली तरी ते त्यांच्याकडील एका गंजलेल्या मोठ्या आकाराच्या भांड्यातून रोज पाच लीटर पाणी पितात. अमो हे जमीनीतील मोठे खड्डे, पडक्या इमारतींच्या आडोश्याला राहतात. त्यांची अवस्था पाहून काही लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना एक कच्च्या भिंती असणारा एक निवारा बांधून दिलाय.
-
अमो यांना गाड्यांच्या साईड मिररमध्ये स्वत:ला पाहायला खूप आवडतं. तेरहान टाइम्सच्या वृत्तानुसार तरुण वयामध्ये अमो यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्यावर मोठा भावनिक आघात झाला. तेव्हापासून त्यांनी अशाप्रकारे एकांतात राहण्याचा निर्णय घेतला.
जगातील सर्वात घाणेरडा माणूस… एका कारणामुळे त्याने ६७ वर्षात एकदाही आंघोळ केली नाही
या व्यक्तीची खाण्याची आवड, सवयी आणि इतर गोष्टीही खूपच विचित्र आहेत
Web Title: Worlds dirtiest man amou haji from iran has not bathed for 67 years scsg