• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. did the president unveil a photo of actor prosenjit as netaji scsg

राष्ट्रपती भवनात नेताजींचं चित्र म्हणून लावला अभिनेत्याचा फोटो?; राष्ट्रापतींनीच केलं अनावरण

या फोटोतील व्यक्ती नेताजी नसून त्यांची भूमिका साकारणार अभिनेता?

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • शनिवारी म्हणजेच २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये नेताजींच्या एका चित्राचे अनावरण करण्यात आलं.
    1/11

    शनिवारी म्हणजेच २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये नेताजींच्या एका चित्राचे अनावरण करण्यात आलं.

  • 2/11

    या चित्राचे फोटो राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवरुनही पोस्ट करण्यात आलेत. 

  • 3/11

    मात्र राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या चित्रातील व्यक्ती ही खरे नेताजी नसून अभिनेता प्रसूनजित चॅटर्जी असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. प्रसूनजित यांनी गुमनामी नावाच्या एका बंगली चित्रपटामध्ये नेताजींची भूमिका साकारली होती. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा नेताजींच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भात होती.

  • 4/11

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील आक्षेप नोंदवला आहे. "आता देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करु शकत नाही)", असं म्हटलं आहे.

  • 5/11

    वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनाही ट्विटवरुन हा फोटो पाहून धक्का बसल्याचं मत नोंदवलं आहे. हा प्रकार खूपच लाजिरवाणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

  • 6/11

    ट्विटरवर इतर अनेक जणांनी हा फोटो अभिनेता प्रसूनजित चॅटर्जींचा असल्याचा दावा केलाय. एकाने गुमनाम चित्रपटाच्या कास्टींगला म्हणजे कलाकार निवडीला मानलं पाहिजे असं म्हटलं आहे.

  • 7/11

    अन्य एकाने हे खूपच हस्यास्पद असल्याचं मत नोंदवलं आहे. हे म्हणजे भगतसिंग यांचे चित्र म्हणून अजय देवगनचा फोटो पोस्ट करण्यासारखं असल्याचा टोला लगावला आहे.

  • 8/11

    आपल्या देशात उपहासात्मक गोष्टी लिहिण्याची गरज नाही त्या घडतात, असा टोला एकाने लगावला आहे.

  • 9/11

    एकाने तर यापुढे जात महात्मा गांधीच्या फोटोसाठी कोणता कलाकार योग्य ठरेल हे फोटोसहीत पोस्ट केलं आहे. 

  • 10/11

    काहींनी हा वाद म्हणजे कपातील वादळ असल्याचं म्हटलं आहे. नेताजींचं हे चित्र खऱ्या फोटोवर आधारितच असल्याचे काहींनी म्हटलं आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही. 

  • 11/11

    दरम्यान या चित्रावरुन रविवारपासून सुरु असणाऱ्या वादावर केंद्र सरकारने सोमवारी दुपारच्या संदर्भात स्पष्टीकरण देत पडदा टाकला,. चित्रावरुन सुरु असणारा वाद हा खोटा असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नेताजींचे हे चित्र त्यांच्या खऱ्या फोटोवरुनच काढण्यात आल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. "हा सर्व वाद हा खोट्या माहितीच्या आधारे सुरु आहे. तसेच ही माहिती कोणतेही संशोधन न करता पसवण्यात आलीय," असंही सरकारने म्हटलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Web Title: Did the president unveil a photo of actor prosenjit as netaji scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.