-
मध्य आशियामधील किर्गिस्तानमध्ये सत्तांतर झालं आहे. येथील प्रखर राष्ट्रवादी नेते सादिर जापारोव (Sadyr Japarov) यांनी गुरुवारी देशाचे राष्ट्राध्यक्ष (President of Kyrgyzstan) म्हणून शपथ घेतली.
-
नुकत्याच किर्गिस्तानमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जापारोव हे जोरदार बहुमताच्या जोरावर जिंकून आलेत.
-
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात किर्गिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष सूरोनबई जीनबेकोव यांना देशात सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतर सत्ता सोडण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर आता येथील जनतेने जापारोव यांना निवडून दिलं आहे.
-
सूरोनबई यांनी सत्ता सोडावी म्हणून देशात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. या आंदोलनादरम्यानच जापारोव हे तुरुंगातून सुटले.
-
देशामध्ये निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गोंधळ झाला. या निवडणुकांमध्ये सरकार समर्थक पक्षांचा विजय झाल्याचे सांगण्यात आलं. मात्र मतमोजणीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करत विरोधकांनी राष्ट्राध्यक्षांना पद सोडण्यास भाग पाडलं. या विरोधकांमध्ये जापारोव यांचाही समावेश होता.
-
जापारोव यांना एका राज्यपालाच्या अपहरणासाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ते २०१७ पासून २०२० पर्यंत तुरुंगात होते.
-
ऑक्टोबर २०२० मध्ये जापारोव हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जीनबेकोव यांच्याविरोधात आपली ताकद वाढवण्यासाठी जास्तीत जास्त समर्थक गोळा करण्याची मोहीम हाती घेतली.
-
मोठ्या प्रमाणात समर्थक पाठिशी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जापारोव यांनी स्वत:ला नेता घोषीत केलं.
-
जापारोव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले समर्थक तसेच एका जनमत चाचणीमध्ये ८१ टक्के मतदारांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या जबाबदाऱ्या आणि हक्क वाढवण्याच्या बाजूने मतदान केलं.
-
जापारोव यांनीही या मागणीचं समर्थन करत गरज पडल्यास किर्गिस्तानच्या संविधानामध्ये बदल करण्याचीही तयारी हवी असं सांगत नवीन मसूदा तयार करण्याची गरज बोलून दाखवली.
-
काही महिन्यांनी घेण्यात आलेल्या अन्य एका जनमत चाचणीमध्ये जापारोव यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसारच जनमताचा कौल पडला.
-
जापारोव यांच्याविरोधात एकूण १६ उमेदवार उभे होते. मात्र प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी ही निवडणूक अगदी सहज आणि मोठ्या फरकाने जिंकली.
-
मात्र असं असतानाही किर्गिस्तानची जनता जापारोव यांच्या पाठिशी उभी राहिल्याचं निवडणुकीमध्ये दिसून आलं.
-
जापारोव यांचा विजय स्वीकारण्यात अदाखन मादुमारोव या उमेदवाराने नकार दिला आणि मतदानात गडबड असल्याचे आरोप केले.
-
मात्र जापारोव यांना मिळालेले मताधित्य ही खूप मोठं होतं आणि इतर उमेदवार त्यांच्या आसपासही नव्हती.
-
मतमोजणीचे निकाल समोर आल्यानंतर जापारोव यांनी रशिया हा यापुढे किर्गिस्तानचा प्रमुख मित्रराष्ट्र असेल असं म्हटलं आहे. सोव्हियत युनिनयच्या विघटनानंतर किर्गिस्तानची निर्मिती झाली असून आता येथे जापारोव यांच्या रुपाने नवीन नेतृत्व देशाला मिळालं आहे. (फोटो : एपी, एएफपी, रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार )
याला म्हणतात लोकप्रियता… तुरुंगातून बाहेर आला, निवडणूक लढला आणि थेट राष्ट्राध्यक्ष झाला
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवार होते पण ही निवडणूकही त्याने एकहाती जिंकली
Web Title: Sadyr japarov is new president of kyrgyzstan scsg