• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. wuhan strawberry music festival as world fights coronavirus wuhan celebrates music festival scsg

Photos: एकीकडे जग करोनाशी लढतंय… दुसरीकडे वुहान मात्र म्युझिक फेस्टिव्हलमध्ये थिरकतंय

एक दोन नाही तब्बल पाच दिवस या फेस्टीव्हचं आयोजन करण्यात आलंय

May 3, 2021 16:00 IST
Follow Us
  • जगभरातील अनेक देशांमध्ये कोरना थैमान घालत आहे. भारतामध्ये दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच अनेक देशांमध्ये या साथीची तिसरी आणि चौथी लाटही आली आहे. असं असतानाच दुसरीकडे हा करोना विषाणू पहिल्यांदा ज्या वुहान प्रांतामध्ये आढळून आला तिथे नुकताच एक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलं होतं. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)
    1/10

    जगभरातील अनेक देशांमध्ये कोरना थैमान घालत आहे. भारतामध्ये दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच अनेक देशांमध्ये या साथीची तिसरी आणि चौथी लाटही आली आहे. असं असतानाच दुसरीकडे हा करोना विषाणू पहिल्यांदा ज्या वुहान प्रांतामध्ये आढळून आला तिथे नुकताच एक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आलं होतं. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन साभार)

  • 2/10

    ३१ डिसेंबर २०१९ पासून २०२० च्या मध्यापर्यंत वुहानसहीत चीनमध्ये अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्येने करोना रुग्ण आढळून आले होते. मात्र त्यानंतर तेथील परिस्थिती सामान्य झाली असून या ८ मार्चला वुहानमधील निर्बंध उठवल्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानंतर येतील परिस्थिती एवढी सामान्य झालीय की इथे आता करोनापूर्व काळाप्रमाणे मोठे उत्सव साजरे केले जाऊ लागले आहेत.

  • 3/10

    वुहान शहरामध्ये शनिवारीपासून वुहान स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिव्हलला सुरुवात झालीय. हा चीनमधल्या सर्वात मोठ्या आऊटडोअर गॅदरिंगपैकी एक असणारा फेस्टिव्हल आहे.

  • 4/10

    शनिवारी सुरु झालेला हा फेस्टिव्हल पाच दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होताना दिसत आहेत.

  • 5/10

    वुहान स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिव्हलच्या ठिकाणी एखाद्या कॉन्सर्टप्रमाणे वातावरण असून येत आहे. लोकं मोठ्याने आरडाओरड करत नाचत आहेत. यंदा आहा फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मागील वर्षी करोनामुळे हा फेस्टिव्हल ऑनलाइन साजरा करण्यात आला होता.

  • 6/10

    या फेस्टिव्हलच्या आयोजकांपैकी एकाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना, "यंदा या ठिकाणी कमी संख्येने लोकं येतील या गोष्टीला प्राधान्य देण्यात आलं. यावर्षी या कार्यक्रमामध्ये ११ हजार जण सहभागी होणार आहेत. स्टेजपासून दूर अंतरावरच चाहत्यांना उभं राहण्याची सोय करण्यात आलीय. अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. काही लोकांनी मास्क घातले असले तरी बहुतांश लोकं ही मास्क न घालताच सहभागी होतायत," अशी माहिती दिली.

  • 7/10

    या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या वुहानमधील एका २३ वर्षीय विद्यार्थी गाओ युचेनने रॉयटर्सशी बोलताना, "मागील वर्षी आम्ही करोनाशी दोन हात करत होते. ती लढाई जिंकून आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. येथील नागरिकांनी त्या विषाणूविरोधात लढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यासाठी शहराला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळेच आता सर्वजण आनंद साजरा करत असून मी सुद्धा यात सहभागी होण्यासाठी फार उत्सुक आहे," असं सांगितलं.

  • 8/10

    वुहानमधील लॉकडाउन उठवल्यानंतरही चीनमध्ये कोविड-१९ साथीचा मोठा फैलाव रोखण्यात चीन यशस्वी झाला आहे. अनेक ठिकाणी, बीजिंग आणि क्विन्डाओ ही शहरे धरून,  कोविड-१९ ची लागण झाली हे खरे. पण तिथेही साथीचा फैलाव वेळीच रोखण्यात चीनला यश आले. चीनमध्ये आर्थिक व्यवहार आणि सामाजिक अभिसरण पूर्ववत सुरू झाले आहे. वुहान स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिव्हल हा याच पूर्ववत झालेल्या चीनचं चित्र दाखवणार ठरतोय.

  • 9/10

    वुहानमध्ये पहिल्यांदा करोनाचा विषाणू आढळून आलेले त्यानंतर येथे सलग दोन महिने लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळेस येथील सर्व नागरिक दोन महिने घरातच होते. करोनामुळे जगात पहिला लॉकडाउन याच शहरात लावण्यात आलेला. अधिकृत आकडेवारीनुसार आता वुहान पुर्णपणे करोना विषाणूमुक्त शहर असून येथे करोनाचा एकही रुग्ण नसल्याने अशा फेस्टीव्हलच्या आयोजनाला परवानगी देण्यात आलीय.

  • 10/10

    या फेस्टीव्हलदरम्यान बॅण्ड, नाच-गाणी आणि इतर धम्माल इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या वुहानमधील तरुण येथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावतानाचे चित्र दिसत आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Wuhan strawberry music festival as world fights coronavirus wuhan celebrates music festival scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.