• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bill gates and melinda gates file for divorce here is information about total assets scsg

Photos: घटस्फोटाचा अर्ज करणारे बिल गेट्स सेकंदाला कमावतात १२ हजार; एकूण संपत्तीचा आकडा आहे…

रोज साडेसहा कोटी खर्च केले तरी संपूर्ण संपत्ती संपवण्यासाठी २१८ वर्ष लागतील

May 4, 2021 19:27 IST
Follow Us
  • मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय. (सर्व फोटो : रॉयटर्स तसेच बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)
    1/30

    मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय. (सर्व फोटो : रॉयटर्स तसेच बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)

  • 2/30

    बिल आणि मेलिंडा या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे.

  • 3/30

    बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं.

  • 4/30

    बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

  • 5/30

    बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, “बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरंच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवलं. आम्ही एक फाऊण्डेशन तयार केलं जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगलं राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असं म्हटलंय.

  • 6/30

    बिल आणि मेलिंडा यांनी सिएटलमधील किंग काऊण्टी सुपिरियर कोर्टात दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये, “आम्ही कारण सांगू शकत नाही मात्र हे लग्न मोडावं लागत आहे,” असं म्हटलं आहे.

  • 7/30

    बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती.

  • 8/30

    त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

  • 9/30

    सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केलं होतं.

  • 10/30

    बिल आणि मेलिंडा दोघांनाही कोर्टात केलेल्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये आमची तिन्ही मुलं सज्ञान आहेत असं म्हटलं आहे.

  • 11/30

    बिल आणि मेलिंडा यांच्या सर्वात धाटक्या मुलगा नुकताच १८ वर्षांचा झाला आहे.

  • 12/30

    दोघांनाही घटस्फोटाच्या अर्जामध्ये संपत्तीचे वाटप कसं होणार याबद्दल आमचं एकमत झाल्याचं म्हटलं आहे.

  • 13/30

    मात्र संपत्तीच्या वाटपासंदर्भातील सविस्तर तपशील बिल आणि मेलिंडा यांनी दिलेला नाही. या घटस्फोटाच्या बातमीमुळे बिल यांची संपत्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरु लागलीय.

  • 14/30

    बिल गेट्स यांनी १९७० च्या दशकामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी सुरु केली.

  • 15/30

    गेट्स यांना या कंपनीने खूप प्रसिद्धी आणि संपत्तीही दिली.

  • 16/30

    सर्वात कमी वयामध्ये अब्जाधीश होण्याचा मान बिल गेट्स यांनी मिळवला होता. ते वयाच्या ३१ व्या वर्षी अब्जाधीश झाले होते.

  • 17/30

    २००८ पर्यंत त्यांचा विक्रम कायम होते. २००८ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा विक्रम फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आपल्या नावावर केला.

  • 18/30

    बिल गेट्स हे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या माध्यमातून समाजउपयोगी काम करत आहेत.

  • 19/30

    रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने हे दोघे घटस्फोट घेणार असले तरी फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद कायम ठेवणार आहेत.

  • 20/30

    फाउंडेशनमध्ये ६५ वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करतील.

  • 21/30

    मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

  • 22/30

    २००० साली सुरु करण्यात आलेलं ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ हे जगभरामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वात मोठ्या खासगी संस्थांपैकी एक आहे.

  • 23/30

    २०१९ साली या संस्थेनचे मूल्य ४३.३ बिलियन डॉलर इतकं होतं, असं संस्थेच्या वेबसाईटवरील डेटावरुन स्पष्ट होतं आहे.

  • 24/30

    फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाने मागील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये जारी केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या ३५ व्या यादीमध्ये बिल गेट्स यांचा समावेश केलाय.

  • 25/30

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये गेट्स हे चौथ्या स्थानी आहेत.

  • 26/30

    श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस, दुसऱ्या स्थानी एलन मस्क आणि तिसऱ्या स्थानी बर्नार्ड अर्नाल्ड आहेत.

  • 27/30

    मागील महिन्यामध्येच प्रकाशित झालेल्या या अहवालामध्ये गेट्स यांची एका सेकंदाची कमाई १२ हजार ५४ रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

  • 28/30

    दिवसाला गेट्स यांच्या कमाईचा आकडा १०२ कोटी रुपये इतका आहे.

  • 29/30

    आकडेमोड केली तर रोज गेट्स यांनी साडेसहा कोटी खर्च केले तरी त्यांना सगळी संपत्ती संपवण्यासाठी २१८ वर्षांचा कालावधी लागेल.

  • 30/30

    बिल गेट्स यांच्याकडे सध्या १२४ बिलियन डॉलर म्हणजेच ९.१५ लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

Web Title: Bill gates and melinda gates file for divorce here is information about total assets scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.