-
मुंबईमध्ये मान्सूनचे दमदार आगमन झालं असून सालाबादप्रमाणे यंदाही पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पहिल्याचा पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय.
-
पहिल्या पावसात ट्रॅकवर पाणी चाचल्याने कुर्ल्यासहीत, सायन रेल्वे स्थानक आणि जीटीबी नगर दरम्यानची वाहतूक ठप्प झालीय.
-
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रॅकवर पाणी साचल्याने कुर्ला ते सीएसटीदरम्यानची वाहतूक थांबवण्यात आलीय.
-
ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे.
-
मात्र या पावसामुळे उडालेल्या गोंधळात कुर्ल्याची भारतभरात चर्चा असल्याचं चित्र ट्विटरवर दिसत आहे. Kurla हा शब्द ट्विटरवर ११ व्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसत आहे.
-
अनेकांनी मिम्स शेअर केलेत. थोडा पाऊस पडला तरी ट्रॅक काय म्हणत असतील सांगणारं मीम पाहा.
-
हे मीम कुर्ल्यातील लोकांची परिस्थिती अशा नावाने व्हायरल झालंय.
-
थोड्या पावसानंतर कुर्ला आणि सायन स्थानकाची परिस्थिती अशी होते म्हणे
-
कुर्ल्यासोबतच #MumaiRains हा हॅशटॅग चर्चेत असून यावरुनही अनेकांनी मिम्स शेअर केलेत.
-
पाऊस पडल्यावर मुंबईकरांचा पहिला प्रश्न हाच असतो असं या व्यक्तीचं म्हणणं आहे.
-
पाऊस पडल्यावर स्टेटस टाकणाऱ्यांना टोमणा लगावणारं हे मीम पाहा…
-
सालाबादप्रमाणे अनेकांमधील लेखक पावसातच जागा होतो.
-
तर अनेकांसाठी पाऊस म्हणजे झोपा काढण्याचा काळ असतो.
-
दादर स्थानक शोधताना प्रवासी…
-
मोदींचा हा फोटो पावसाचा फायदा होईल सांगणारा आहे.
-
अनेकांनी हा पहिलाच पाऊस म्हणजे हल्ला वाटतोय असं मत व्यक्त केलंय.
Kurla ची देशभरात चर्चा; पावसाबरोबर बाबू भैय्या, मोदी, रेणू शहाणे, जॉन लिव्हरच्या Memes चाही पडला पाऊस
मुंबईमध्ये मान्सूनचं दमदार आगमन झालं असून सकाळपासून धो धो पाऊस पडतोय, त्यामुळे नेटकऱ्यांच्या भन्नाट कल्पांना पालवी फुटलीय आणि मिम्सचाही पाऊस पडलाय
Web Title: Mumbai rains viral memes kurla trends on twitter scsg