-
देशातील सर्वात मौल्यवान म्हणजेच व्हॅल्युएबल ब्रॅण्ड कोणते आहेत यासंदर्भातील सन २०२१ ची यादी ब्रॅण्ड फायनॅन्स या आर्थिक मुल्यमापन करणाऱ्या कंपनीने जाहीर केली. यामध्ये भारतातील अव्वल शंभर कंपन्यांचे मूल्य मागील वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वधारल्याचं दिसून आलं. जाणून घेऊयात या यादीमध्ये नक्की कोणकोणत्या कंपन्या आहेत.
-
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची रिलायन्स जिओ कंपनी भारतातील मोस्ट व्हॅल्यूएबल कंपन्यांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे.
-
रिलायन्स जिओचं एकूण मूल्य ४ हजार ८१५ मिलियन डॉलर इतकं आहे.
-
या यादीमध्ये नवव्या क्रमांकाला महिंद्रा राईज ही महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपची कंपनी आहे.
-
महिंद्रा राईजचं मूल्य ५ हजार ३७८ मिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे.
-
आयटी क्षेत्रातील ओळखीचं नाव असणारी एचसीएल ही कंपनी सर्वाधिक मूल्य असणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये आठव्या स्थानी आहे.
-
एचसीएलचं एकूण मूल्य ५ हजार ५२४ मिलियन डॉलर इतकं आहे.
-
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडियाही या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे.
-
स्टेट बँकेचे एकूण मूल्य ५ हजार ८४३ मिलियन इतकं आहे.
-
एअरटेल ही कंपनी या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
-
एअरटेलची एकूण किंमत ६ हजार ६० बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
-
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणारी एचडीएफसी बँक सर्वाधिक मुल्य असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये भारतात पाचव्या स्थानावर आहे.
-
एचडीएफसीचे एकूण मूल्य ६.५ बिलियन डॉलर इतकं आहे. मागील वर्षी एचडीएफसी या यादीत सहाव्या स्थानी होती.
-
सर्वाधिक मूल्य असणाऱ्या ब्रॅण्ड्सच्या यदीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबांनींचा रिलायन्स समुह चौथ्या स्थानी आहे.
-
रिलायन्सचे एकूण मूल्य जवळपास ८.१३ बिलियन डॉलर इतकं आहे.
-
भारतामधील आयटी क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणजेच इन्फोसेस या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
-
इन्फोसेसचे बाजार मूल्य ८.४ बिलियन डॉलर इतकं आहे.
-
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी सर्वात मैल्यवान ब्रॅण्डच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
-
एलआयसीचे मूल्य ८.६ बिलियन डॉलर इतकं आहे.
-
या यादीमध्ये टाटा समुह हा पहिल्या स्थानी असून मागील वर्षीप्रमाणे यंदाही टाटा समुहाला मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅण्ड होण्याचा बहुमान मिळाला आहे.
-
टाटा समुहाची एकूण किंमत २१.३ बिलियन डॉलर इतकी आहे.
-
सहा खंडांमधील १०० हून अधिक देशांमध्ये टाटाचा उद्योग व्यवसायक आहे. समुहाच्या अंतर्गत एकूण ३० कंपन्या आहेत.
-
टाटा समुहाअंतर्गत येणाऱ्या ३० कंपन्यांमध्ये अगदी टाटा स्टील्सपासून टाटा मोटर्ट आणि टीसीएसपासून टाटा क्स्टमर प्रो़क्टपर्यंतच्या कंपन्यांच्या समावेश आहे.
-
करोना कालावधीमध्येही टाटा समुहाला ६ टक्के नफा झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे.
-
मागील वर्षीही टाटा कंपनी या यादीमध्ये पहिल्या स्थानी होती. (सर्व फोटो रॉयटर्स आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)
Top 10 Most Valuable Brands In India 2021: महिंद्रा नवव्या, रिलायन्स चौथ्या तर टाटा…
भारतातील अव्वल शंभर कंपन्यांचे मूल्य मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी वधारल्याचं दिसून आलं. या यादीमध्ये नक्की कोणकोणत्या कंपन्या आहेत पाहूयात…
Web Title: Most valuable brands in india 2021 by brand finance scsg