Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mumbai local train travel permission for people taken 2 doses of coronavirus vaccine readers opinion scsg

सरकारला लसीकरणावर विश्वास नाही का?; लोकल प्रवासात मुभा देण्यावरुन जनतेचा राज ठाकरेंच्या बाजूने कौल

दोन डोस दिलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा द्यावी की नाही या मुद्द्यावरुन जनमत हे राज ठाकरेंच्या बाजूने असल्याचं चित्र दिसत आहे.

July 30, 2021 13:22 IST
Follow Us
  • Mumbai Local Train Travel Permission for People taken 2 doses of Coronavirus Vaccine
    1/20

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यामध्ये असणाऱ्या करोनासंदर्भातील नियमांवर आपल्या खास शैलीमध्ये टीका केलीय. काही दिवसांपूर्वीच उपस्थित केलेला दोन लसी घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करु देण्याचा मुद्दा राज यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये पुन्हा उपस्थित केला.

  • 2/20

    इतकचं नाही तर बाहेरच्या राज्यांमध्ये सगळं सुरु आहे तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी पुण्यामधील पत्रकारपरिषदेमध्ये उपस्थित केलाय. मात्र आता हा विषय केवळ राजकारण्यांपूरताच राहिला नसून सर्वसामान्यही अशीच मागणी करताना दिसत आहेत.

  • 3/20

    पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये राज ठाकरेंनी लॉकडाउनसंदर्भात आता सरकारने आणखीन थोडी शिथिलता देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाउनमुळे लोकांचे उद्योग बंद झालेत, असं सांगतानाच यांना लॉकडाउन करायला काय जातंय?, असा टोलाही राज्य सरकारला राज यांनी लगावला आहे. एवढचं नाही तर लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का असा सवाल उपस्थित करत जर असं असेल तर कोणी प्रश्न विचारायलाच नकोत, असंही राज म्हणालेत.

  • 4/20

    याच संदर्भात लोकसत्ता डॉटकॉमने काही दिवसांपूर्वी जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सहभागी झालेल्यांपैकी ८७ टक्के वाचकांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा द्यावी असं म्हटलेलं.

  • 5/20

    लोकसत्ता डॉटकॉमच्या वाचकांनी ही मागणी योग्य असल्याचं म्हटलंय

  • 6/20

    लोकसत्ताच्या वाचकांनी ट्विटरवरुन आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. मागणी योग्य असून परवानगी दिली नाही तर सरकारला लसीकरणावर विश्वास नाही असं म्हणता येईल असंही काहींनी म्हटलंय.

  • 7/20

    फेसबुकवही यासंदर्भातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता डॉटकॉमने केला.

  • 8/20

    फेसबुकवरही या विषयावर मतमतांतरे दिसली तरी अनेकांनी लोकल सेवा दोन डोस घेतलेल्यांना सुरु करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

  • 9/20

    या फेसबुकवरील अन्य काही प्रतिक्रिया ज्यामध्ये सध्या आहे तो नियम योग्य कसा आहे याबद्दल काही जणांनी भाष्य केलं आहे.

  • 10/20

    मुख्यमंत्र्यांना पत्र > करोनाचे निर्बंध लागू करताना राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली. ही बंदी अद्याप उठवण्यात आलेली नसून, लोकांकडून बंदी हटवण्याची मागणी होत आहे. या मुद्द्यासंदर्भात राज ठाकरे यांनी  काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पत्रही लिहिलं आहे.

  • 11/20

    सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला होता.  “मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी”, असं राज यांनी पत्रात म्हटलं होतं.

  • 12/20

    मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालयं सुरू आहेत. सर्वांना घरून काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. त्यात लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत, असं राज मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले होते.

  • 13/20

    बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार? > महाराष्ट्र सरकारनं बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्यानं रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?, असा प्रश्न राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारलेला.

  • 14/20

    महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही > ही साथ एकाएकी जाणार नाही, असं जगातल्या तज्ञाचं मत आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात, असंही राज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं.

  • 15/20

    लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतंय असं की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही, असा टोला राज यांनी पत्रातून लगावलेला.

  • 16/20

    महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली, अशा शब्दांमध्ये राज यांनी सरकारला या पत्रातून इशारा दिलाय.

  • 17/20

    माझा पक्ष मुंबईकरांसोबत उभा राहील > आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असंही राज म्हणाले.

  • 18/20

    मुंबई लोकल ट्रेनच्या विषयावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र सध्या पहायला मिळत आहे.

  • 19/20

    मात्र मागील दीड वर्षांपासून निर्बंध आणि नियमांमुळे अनेकांना लोक ट्रेनचा प्रवास करता येत नसल्याने अनेकांनी राज ठाकरेंनी केलेली मागणी योग्य असल्याचं म्हटलंय.

  • 20/20

    लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरुन तरी जनता सरकामधील ठाकरेंऐवजी विरोधक असणाऱ्या राज ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचं चित्र दिसत आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirusमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Mumbai local train travel permission for people taken 2 doses of coronavirus vaccine readers opinion scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.