• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. china wild elephants head to safety after long trek scsg

१३०० किमीचा प्रवास… १४ ड्रोन्स, ५०० कर्मचारी त्या १४ हत्तींवर सतत होते लक्ष ठेऊन; कारण वाचून थक्क व्हाल

एखाद्या शहरामध्ये रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यांवर या हत्तीचा कळप दिसायचा तर कधी एखाद्या गावामध्ये हे हत्ती दिसून यायचे

August 12, 2021 17:33 IST
Follow Us
  • China wild elephants head to safety after long trek
    1/17

    चीनमध्ये आशियाई हत्तीचा एक कळप मोठ्या प्रवासासाठी निघाला होता. १४ हत्तींचा हा कळप सोमवारी युन्नान प्रांतातील संरक्षक वन परिसराजवळ पोहचलाय.

  • 2/17

    मागील १७ महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च २०२० पासून या हत्तींनी १३०० किलोमीटरचा म्हणजेच ८०७ मैलांचा प्रवास केलाय.

  • 3/17

    हे १४ हत्ती मागील १७ महिन्यांमध्ये अनेक शहरांमधून, शेतांमधून आणि गावांमधून चालत आलेत. आधी तर हे हत्ती कुठे निघाले आहेत याचा यंत्रणांना शोध घ्यावा लागला होता.

  • 4/17

    काही शहरांमध्ये रात्रीच्या वेळेस हा हत्तींचा कळप अशाप्रकारे सुनसान रस्त्यांवरुन चालताना कॅमेरांनी टीपलाय.

  • 5/17

    वाटेत त्यांनी शेतमालाचं मोठं नुकसान केलं आहे. मात्र स्थानिक सरकारने या हत्तींना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

  • 6/17

    या हत्तींनी रस्त्यात येणाऱ्या काही गावांमध्ये आणि शेतांमध्ये धुडगूस घातला तरी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यांना हुसकावून लावण्यात आलं नाही,.

  • 7/17

    बीबीसी आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या हत्तींच्या कळपावर चीनमधील अधिकारी लक्ष ठेऊन होते.

  • 8/17

    या हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी १४ ड्रोन्स तैनात करण्यात आलेले. ५०० जणांना या हत्तींना योग्य आहार मिळेल यासंदर्भात काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली.

  • 9/17

    जून महिन्यामध्ये चीनमधील जोरदार पावसामुळे या हत्तींच्या प्रवासाला थोडा ब्रेक लागला. याच ब्रेक दरम्यान हा हत्तींचा कळत जियांग जिल्ह्यामधील एका जंगलात आराम करताना आढळून आला होता.

  • 10/17

    जंगलामध्ये झोपलेल्या हत्तीच्या कळपांचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेला. प्रवासावर निघालेल्या या हत्तींना व्हायरल फोटोंमुळे जगभरामध्ये ओळख मिळाली.

  • 11/17

    रस्त्यांवरील वाहतूक थांबवून या हत्तींना नैऋत्य दिशेकडील जंगलांमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला होता.

  • 12/17

    या कळपामध्ये तीन लहान हत्तींसहीत एकूण १४ हत्ती आहेत. यात सहा मादी, तीन नर, दोन लहान हत्ती आणि तीन अगदी छोटे हत्ती आहेत.

  • 13/17

    युन्नान फॉरेस्ट फायरफायटिंग ब्रिगेड या हत्तींवर सध्या नजर ठेऊन होते.

  • 14/17

    या हत्तींचा मार्ग बदलण्याचा अधिकाऱ्यांनी केलेला एक प्रयत्न अपयशी ठरला होता.

  • 15/17

    हत्तीचा हा कळप जूनमध्ये नैऋत्येकडील जिशुआंगबन्ना येथील मेंग्यांगजी पार्ककडे परत वळल्याचं पहायला मिळालं होतं.

  • 16/17

    आता हत्तीसाठी एवढं करण्याची काय गरज होती असा तुम्हाला प्रश्न पडले. तर त्याचं उत्तर आहे चीनमध्ये हत्तींची संख्या फारच कमी असल्याने या १४ हत्तींच्या प्रत्येक हलचालीवर यंत्रणांची नजर होती. पण या हत्तींनी एवढ्या लांब पल्ल्याचं स्थलांतर का केलं हे अद्याप न सुटलेलं कोडं असलं तरी त्यांना संरक्षण का देण्यात आलेलं हे चीनमधील हत्तींची संख्या पाहिल्यावर स्पष्ट होतं.

  • चीनमध्ये केवळ ३०० हत्तींचं अस्तित्व आहे. त्यामुळेच या हत्तींची खूप काळजी घेण्यात आली. (फोटो : रॉयटर्स, एपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन)
TOPICS
सोशल व्हायरलSocial Viral

Web Title: China wild elephants head to safety after long trek scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.