• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what is cryptocurrency and how does it work know everything on background of cryptocurrency and regulation of official digital currency bill 2021 scsg

जाणून घ्या: क्रिप्टोकरन्सी म्हणजे नक्की काय?, त्याची सुरुवात कोणी केली? हे व्यवहार कसे केले जातात?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? यासंदर्भात अनेकांना फारशी माहिती नाही. त्यावर टाकलेली ही नजर…

Updated: November 24, 2021 10:03 IST
Follow Us
  • what is cryptocurrency and how does it work
    1/15

    हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या सत्तेत असणारं मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नवीन विधेयकानुसार भारतामध्ये सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे.

  • 2/15

    काही अपवाद वगळता सर्व चलनांवर बंदी घालून आभासी चलनासंदर्भातील व्यवहार नियमन करण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र या क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील विधेयकाच्या वृत्तामुळे क्रिप्टोकरन्सी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. अनेकांना क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय हेच ठाऊक नाहीय. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. त्यावरच टाकलेली ही नजर…

  • 3/15

    आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

  • 4/15

    २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली.

  • 5/15

    एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.

  • 6/15

    अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.

  • 7/15

    कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.

  • 8/15

    अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.

  • 9/15

    ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे.भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ३८ लाख ६१ हजार रुपये इतके आहे.

  • 10/15

    ‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.

  • 11/15

    पण नफा जास्त असला तरी यामध्ये तोट्याचं गणितही त्याच प्रमाणामध्ये असतं. म्हणून सरकाने यावर नियमन करण्याचा निर्णय घेतलाय.

  • 12/15

    मात्र सरकारच्या या निर्णयामुळे बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सीजचा दर सरासरी १५ टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळत आहे. बिटकॉनचा दर १७ टक्क्यांहून अधिक घसरलाय. तर इथेरियमच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक घट झालीय. थिथेरचा दरही जवळजवळ १८ टक्क्यांनी घसरलाय.

  • 13/15

    तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.

  • 14/15

    साहजिकच बिटकॉइनला मिळणारा प्रतिसाद पाहून फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते.

  • फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
TOPICS
मराठी
Marathi
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: What is cryptocurrency and how does it work know everything on background of cryptocurrency and regulation of official digital currency bill 2021 scsg

IndianExpress
  • ‘If not asking for Article 370 is pragmatism, we should have let BJP win, statehood would have been easier’: Srinagar NC MP
  • India ‘strategic ally’, trade deal being finalised: White House
  • PM Modi on 10 years of Digital India: ‘It has become a people’s movement’
  • Pawan Kalyan, Annamalai and others booked for violating court conditions at Lord Murugan conference in Madurai
  • India vs England 2nd Test: Nitish Reddy, Washington Sundar likely to play; Jasprit Bumrah, Kuldeep Yadav unlikely
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.